King Kohli applauds Bumrah at Wankhede
King Kohli applauds Bumrah at Wankhede : टी20 वर्ल्डकप आणि वर्ल्ड चॅम्पियनची ती विजयी परेड डोळ्यांची पारणे फेडणारी होती. मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेटप्रेमींची त्सुनामी आली होती. हा क्षण डोळ्यात साठवणारा होता. वानखेडेच्या मैदानावर पोहचल्यावर संघातील खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. किंग कोहलीने बुमराहचे विशेष कौतुक करीत त्याच्यावर शाबासकीची थाप टाकली. त्याच्यासाठी हे खूप मोठे प्रोत्साहन होते. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची सांघिक कामगिरी दिसून आली. साखळी फेरी ते अंतिम फेरीपर्यंत विजयी घोडदौड कायम राहिली आहे. कॅनडा विरुद्धचा सामना काय तो फक्त पावसामुळे रद्द झाला. या व्यतिरिक्त टीम इंडियाने पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेसारख्या दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं.
डोळे झाकून सही करण्याची तयारी
या स्पर्धेतील काही सामना हातातून जाण्यासारखे होते. मात्र टीम इंडियाने कमबॅक करत सामन्यात विजय मिळवून दिला. पाकिस्तान विरूद्धच्या हायव्होल्टेज सामन्यातही असंच झालं होतं. फक्त 119 धावांचं आव्हान असताना टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यातही नाजूक स्थिती होती. मात्र गोलंदाजांनी कमाल केली आणि हा सामना 24 धावांनी जिंकला. अंतिम सामन्यात चित्र काही वेगळं नव्हतं. टी20 क्रिकेटमध्ये 30 चेंडूत 30 धावा म्हणजे सहज होणारं टार्गेट होतं. पण तरीही टीम इंडियाने कमबॅक केलं आणि हा सामना 7 धावांनी जिंकला. या विजयाची आकडेमोड केल्यानंतर विराट कोहली जसप्रीत बुमराहचं कौतुक करण्यास मागे पडला नाही. डोळे झाकून सही करण्याची तयारी देखील दाखवली.
विराट कोहलीने क्षणाचाही विलंब न करता, बुमराहसाठी काय पण….
विराट कोहली म्हणाला की, “मला अशा व्यक्तीचे कौतुक करावे लागेल, ज्याने आम्हाला खेळात परत आणले. पुन्हा, पुन्हा, पुन्हा जिंकवलं. मी सर्वांना सांगेन की “बुमराह” साठी टाळ्या झाल्या पाहीजेत.” विराट कोहलीने बुमराहचं कौतुक करताना पुढे सांगितलं की, बुमराहसारखा गोलंदाज क्वचितच एक जनरेशनमध्ये दिसतो. आम्ही खूप नशिबवान आहोत की तो आमच्यासोबत खेळत आहे. यावेळी अँकरिंग करणाऱ्या गौरव कपूरने विराट कोहलीला विचारलं की, मी विचार करत करत आहे की जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावं? तू सही करणार का? गौरवने असा प्रश्न विचारताच विराट कोहलीने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं की, मी आता सही करायला तयार आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील चमकदार कागमरीसाठी जसप्रीत बुमराहला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. जसप्रीत बुमराहने 8 सामन्यात 4.17 च्या इकोनॉमी रेटने 15 गडी बाद केले होते. मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर आणलं होतं. त्यामुळे जसप्रीत बुमराहचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने आपल्या निवृत्तिबाबतही जाहीरपणे भाष् केलं. “माझी निवृत्ती अजून खूप लांब आहे. मी आता कुठे खेळायला सुरु केलं आहे.”