Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 

माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या मते २०२७ च्या विश्वचषकानंतर दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती पत्करतील तेव्हा एकदिवसीय क्रिकेटचे अस्तित्व आणि प्रासंगिकता धोक्यात येईल.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 01, 2026 | 08:54 PM
Will the retirement of the Rohit-Virat duo mark the end of ODI cricket? Former spinner Ravichandran Ashwin's shocking statement is creating a buzz.

Will the retirement of the Rohit-Virat duo mark the end of ODI cricket? Former spinner Ravichandran Ashwin's shocking statement is creating a buzz.

Follow Us
Close
Follow Us:

Ravichandran Ashwin’s comments on ODI cricket : माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एकदिवसीय क्रिकेटबाबत मोठे भाष्य केले आहे. त्याच्यामते २०२७ च्या विश्वचषकानंतर दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्त होतील तेव्हा एकदिवसीय क्रिकेटचे अस्तित्व आणि प्रासंगिकता धोक्यात येण्याची शक्यता आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट आणि रोहितच्या सहभागाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. मात्र, माजी दिग्गज फिरकीपटूने असा विश्वास व्यक्त केला की,  वाढत्या टी-२० लीग आणि कसोटी क्रिकेटचे वाढते महत्त्व यामुळे एकदिवसीय स्वरूपासाठी जागा हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित

आर अश्विनने त्याच्या हिंदी युट्यूब चॅनल ‘ऐश की बात’ वर संवाद साधला आहे. “२०२७ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटचे भविष्य काय असेल हे मला माहित नाही. मात्र, मला त्याबद्दल थोडी काळजी वाटते. मी विजय हजारे ट्रॉफी पाहत आहे, परंतु मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पाहिल्याप्रमाणे ते पाहणे थोडे कठीण आहे.” अश्विन पुढे म्हणाला की, “प्रेक्षक काय पाहू इच्छितात हे देखील आपल्याला समजून घ्यायला हवे. मला वाटते की कसोटी क्रिकेटसाठी अजून देखील जागा आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटसाठी खरोखर जागा शिल्लक नाही.”

भारताचा माजी यशस्वी गोलंदाज अश्विनचा असा विश्वास आहे की विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय स्वरूप आणखी कमकुवत होऊ शकते. दोन्ही खेळाडूंनी एकत्रितपणे ८६ एकदिवसीय शतके ठोकली आहेत. अश्विन म्हणाला की, “बघा, जेव्हा रोहित आणि विराट विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळायला मैदानात आले तेव्हा लोकांनी तती स्पर्धा पाहण्यास सुरुवात केली. आम्हाला माहित आहे की खेळ नेहमीच खेळाडूंपेक्षा मोठा असतो, परंतु कधीकधी या खेळाडूंचे (रोहित आणि विराट) पुनरागमन खेळ प्रासंगिक ठेवण्यासाठी देखील आवश्यक असते.”

अश्विन म्हणाला की, “विजय हजारे ट्रॉफी ही एक घरगुती एकदिवसीय स्पर्धा आहे जी फारसे लोक पाहत नाहीत. परंतु विराट आणि रोहितच्या सहभागामुळे लोक ती पाहण्यासाठी उपस्थित राहिले होते. मग प्रश्न असा आहे की, जेव्हा ते एकदिवसीय सामने खेळणे थांबवतील तेव्हा काय होईल?” असे देखील त्याने म्हटले आहे.

आश्विन म्हणाला की, “एकदिवसीय क्रिकेट हा एक उत्तम प्रकार होता, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू तयार होत असत, जो १०-१५ षटकांसाठी एक धाव घेऊन डाव सांभाळत असे आणि नंतर शेवटी स्फोटक फलंदाजी करताना दिसत असे. आता, असे खेळाडू नाहीत आणि अशा प्रकारच्या फलंदाजीची गरज नाही, कारण वर्तुळात दोन नवीन चेंडू आणि पाच क्षेत्ररक्षक आहेत.”

हेही वाचा : BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

 

Web Title: According to ravichandran ashwin the retirement of rohit and virat will diminish odi cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Ravichandran Ashwin
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण
1

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी
2

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले
3

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले

KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज
4

KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.