Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पुण्यात चाललंय काय? लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला… ; आरोपीला UP मधून बेड्या

तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या माहितीनुसार रमेश आणि अपह्रत मुलगी उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बामणौली गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथक उत्तरप्रदेशात दाखल झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 25, 2025 | 04:51 PM
Crime News: पुण्यात चाललंय काय? लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला… ; आरोपीला UP मधून बेड्या
Follow Us
Close
Follow Us:

पुण्यात लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले
फुरसूंगी पोलिसांनी उत्तरप्रदेशातून काढले शोधून
एक महिना विशेष मोहीम राबवून घेण्यात आला शोध 

पुणे: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला तरुणाने पळवून नेले होते. पण, तिच्या कुटूंबियांनी पोलिसांत धाव घेत परिस्थितीची माहिती दिली अन् फुरसूंगी पोलिसांनी तब्बल एक महिना विशेष मोहिम राबवून तिचा शोध घेतला. तसेच, तिला पळवून नेणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे ते हैद्राबाद आणि हैद्राबाद ते उत्तरप्रदेशपर्यंत शोध मोहिम राबवून या मुलीचा शोध लावला आहे.

रमेश मसनाजी पिट्टलवाड (वय २५, रा. धगनगर वस्ती उरूळी देवाजी, मुळ. नादेंड) तसेच त्याची सावत्र आई मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड (वय ३५, साखरे वस्ती हिंजवडी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नानासाहेब जाधव आणि त्यांचे पथकाने कारवाई केली.
रमेश मुळचा नादेंड जिल्ह्यातील असून, तो कामानिमित्त पुण्यात आलेला आहे. तो फुरसुंगी भागात राहत होता. त्याची एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती. त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या वयाचा फायदा घेत तिच्या मनात विश्वास निर्माण केला. नंतर मात्र, तिला पळवून नेले. त्यामध्ये त्याची सावत्र आई मुक्ताबाई हिने मदत केली. तिने रमेशला मुलीला घेऊन जाताना माझे नातेवाईक हैद्राबादला आहेत, तु तिकडे जा असे सांगून खर्चासाठी पैसे दिले होते.

पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

रेल्वेने दोघे हैद्राबादला गेले होते. दरम्यान, मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी फुरसूंगी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनेचे गांर्भिय ओळकत तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळी रमेश हा हैद्राबादला असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या सावत्र आईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने दोघे हैद्राबादला गेल्याचे सांगितले. परंतू पोलिस पोहचण्यापुर्वीच तो मुलीला घेऊन तेथून पसार झाला होता.

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार करून खून; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला

तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या माहितीनुसार रमेश आणि अपह्रत मुलगी उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बामणौली गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथक उत्तरप्रदेशात दाखल झाले. चार दिवस स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहिम राबवत रमेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तो उत्तरप्रदेशात राहणाऱ्या त्याच्या मावशी-काकाकडे थांबला होता. पोलिसांनी रमेशला पकडून पुण्यात आणले. १८ ऑक्टोबर रोजी रमेश मुलीला घेऊन पळाला होता. तब्बल एक महिना तपास करून फुरसूंगी पोलिसांनी अखेर त्याला पकडून मुलीची सुटका केली.

Web Title: A minor girl was kidnapped with the promise of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • crime news
  • kidnapping
  • pune news

संबंधित बातम्या

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा
1

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ
2

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ

सर्वसामान्यांवर दहशत माजवून मोठे झालेले गुन्हेगार; टिपू पठाण अन् बंटी पवार टोळीचा ‘असा’ आहे गुन्हेगारी इतिहास
3

सर्वसामान्यांवर दहशत माजवून मोठे झालेले गुन्हेगार; टिपू पठाण अन् बंटी पवार टोळीचा ‘असा’ आहे गुन्हेगारी इतिहास

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार करून खून; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला
4

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार करून खून; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.