Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अशातच आता आता औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 08, 2026 | 05:45 PM
हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला
  • अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
  • औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
लातूर : हेल्मेट जवळ होते; मात्र ते डोक्यावर परिधान न करता मोटारसायकलच्या हँडलला अडकवून प्रवास करणे २१ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हेल्मेट केवळ सोबत असणे नव्हे, तर प्रत्येक प्रवासात ते डोक्यावर व्यवस्थित परिधान करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

प्रफुल सुनील काळे (वय २१, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) हे मोटारसायकल क्रमांक एमएच २४ सीएच ४०४२ वरून औरादकडून निलंग्याकडे जात होते. दरम्यान, मोघे म्हसोबावाडी पाटीजवळ रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पुढे जाणाऱ्या एमएच १२ जीएस १९३० क्रमांकाच्या मोटारसायकलच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे प्रफुल काळे यांच्या मोटारसायकलची पुढील वाहनाला धडक झाली. धडकेनंतर प्रफुल काळे मोटारसायकलवरून उडून सिमेंटच्या रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय, निलंगा येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा : निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

हेल्मेट होते; पण डोक्यावर नव्हते!

या अपघातातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रफुल काळे यांच्याकडे हेल्मेट होते. मात्र त्यांनी ते डोक्यावर परिधान केले नव्हते. हेल्मेट मोटारसायकलच्या हँडलला अडकवून ते प्रवास करत होते. अपघाताच्या वेळी डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेल्मेट मोटारसायकलला अडकवून नेणे, हातात घेणे किंवा केवळ सोबत ठेवणे यामुळे डोक्याचे संरक्षण होत नाही. अपघाताच्या क्षणी हेल्मेट डोक्यावर योग्य पद्धतीने परिधान केलेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘हेल्मेट आहे’ यापेक्षा ‘हेल्मेट डोक्यावर आहे’ हे अधिक महत्त्वाचे आहे. काही सेकंदांचा निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा याचे उदाहरण पहायला मिळाले.

Web Title: A young man has died in an accident within the jurisdiction of the aurad police station nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Case

संबंधित बातम्या

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
1

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!
2

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
3

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
4

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.