Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

नाशिकच्या राजीवनगरमध्ये रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वाराला रस्त्यावरील खड्डा दिसलाच नाही आणि दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात ६१ वर्षीय प्रकाश वंडेशकर यांचा मृत्यू झाला. आता या घटनेनंतर रस्त्याच्या कामातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 08, 2026 | 05:15 PM
Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Accident News: रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या राजीवनगर परिसरात भीषण अपघात; प्रकाश वंडेशकर यांचा मृत्यू
  • रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट खड्ड्यात
  • बॅरिकेट्स आणि सूचना फलकांची सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का? नागरिकांचा सवाल
 

नाशिकच्या राजीवनगर परिसरात रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळून ६१ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश वंडेशकर असे मृताचे नाव असून, रात्रीच्या अंधारात खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली

नाशिकच्या राजीवनगर परिसरात रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. प्रकाश वंडेशकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कलानगरकडून राजीवनगरच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. संबंधित रस्त्यावर काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खोदण्यात आला होता. रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असल्याने वंडेशकर यांना या खड्ड्याचा अंदाज आला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली.

डोक्याला गंभीर दुखापत; जागीच मृत्यू

दुचाकी खड्ड्यात कोसळल्यानंतर वंडेशकर यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. या दुखापतींमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?

सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल

या घटनेनंतर रस्त्याचे खोदकाम करणारे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार यांच्या कामाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रशासनाकडून बॅरिकेट्स आणि सूचना फलक लावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, रात्रीच्या वेळी ही सुरक्षा व्यवस्था वाहनचालकांच्या दृष्टीने पुरेशी होती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील खोदकामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या अपघातासाठी नेमकी परिस्थिती काय होती, तसेच खड्ड्याभोवती करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का, याचा तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.

Web Title: Nashik rajivnagar road pit bike accident 61 year old man death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Case
  • Accident Death
  • Accident in Nashik
  • Road Accidents

संबंधित बातम्या

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!
1

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!

घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू
2

घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
3

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
4

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.