सोलापूर : माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराई प्रकल्प व रोपळे ग्रामस्थ यांच्या वतीने दहा झाडे लावण्यात आली असून या सह्याद्री देवराई चा प्रकल्पाची फीत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते कापून लोकार्पण सोहळा व अनोखा व्हेलेटाईन डे साजरा करण्यात आला.
सिनेअभिनेते सयाजी शिंदे हे रोपळे येथे आल्यानंतर रोपळे ग्रामस्थांनी सयाजी शिंदे यांची हलगी वाजवत घोड्यावरून मिरवणूक काढली. यावेळी सयाजी शिंदे यांना हलगी वाजविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी यावेळी हलगी वाजवत उपस्थितांची मने जिंकली. रोपळे येथील सह्याद्री देवराई मध्ये दहा हजार झाडांची लागवड केली आहे. याठिकाणी मोठे शेततळे तयार करणार असून त्या शेत तळ्यातील कागदासाठी 5 लाख रुपये मदत देणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले. यावेळी सरपंच तात्यासाहेब गोडगे, सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप, सह्याद्री देवराई चे मार्गदर्शक सचिन चांदणे रोपळे ग्रामस्थांनी उपस्थित होते.
[read_also content=”‘विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न राहता सावित्रीबाईंच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवावेत : मुख्यमंत्री https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/unveiling-of-full-size-statue-of-savitribai-phule-at-pune-university-238449.html”]