कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.राजकीय विद्यापीठ कागल नगरपालिकेत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या युतीनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली..ही राजकीय घटना ताजी असतानाच आता जयसिंगपूर नगरपालिकेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना – काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे..स्वाभीमानीला आमदार सतेज पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या भाजप ताराराणी आघाडीची साथ मिळाली आहे..शिवसेनचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी , दत्त उद्योग समूहाचे प्रमुख काँग्रेस नेते गणपतराव पाटील आणि गुरूदत्त कारखान्याचे चेअरमन भाजप नेते माधवराव घाटगे आणि राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी युती केली असून जयसिंगपूर शहर विकास पॅनलची घोषणा केली आहे..आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे महायुतीमधील आमदार आहेत.. मात्र त्यांच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्याशी राजकीय वैर असल्याने नगरपालिका निवडणुकीत भाजपने देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे..