सीईटीचे वेळापत्रक जाहीर (फोटो- istockphoto)
सीईटी परीक्षा उच्च व तांत्रिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाची
अधिसूचनेत जाहीर करण्यात आल्या प्रवेश परीक्षांच्या तारखा
मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार
पुणे: महाराष्ट्र राज्यातील उच्च व तांत्रिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाची मानली जाणारी सीईटी २०२६ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक दि. २१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तारखा या अधिसूचनेत जाहीर करण्यात आल्या.
अंदाजे वेळापत्रक अभ्यासक्रमांसाठी मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक तात्पुरते असून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेल च्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.
मार्च २०२६ महिन्यात दि. २४ रोजी एमएएच-एम.पी.एड, दि. २५ एमएएच-एम.पी.एड फील्ड टेस्ट (ऑफलाइन), दि. २५ एमएएच-एमएड, दि. २५ एमएएच-एम.एचएमसीटी, दि. २७,२९ एमएएच-बी.एड (सामान्य आणि विशेष) आणि ईएलसीटी, दि ३० एमएएच-एमसीए होणार आहे.
एप्रिल २०२६ महिन्यात दि. १ ते २ एमएएच-एलएल.बी ३ वर्षे, दि. ४ एमएएच-बी.पी.एड., दि. ५ ते ७ बी.पी.एड. फील्ड टेस्ट (ऑफलाइन), दि. ५ एमएएच-बी.डिझाइन, दि. ६ ते ८ एमएएच-एमबीए/एमएमएस, दि. ९ एमएएच-बी.एड.एम.एड (3 वर्षे), दि. १० एमएएच-एएसी, दि. ११ ते १९ एमएचटी-सीईटी (पीसीएम ग्रुप), दि. २१ ते २६ एमएचटी-सीईटी (पीसीबी ग्रुप), दि. २८ ते ३० एमएएच-बी.एचएमसीटी / बीसीए / बीबीए / बीएमएस / बीबीएम सीईटी होणार आहे.
मे २०२६ महिन्यातील दि. ५ एमएच-डीपीएन / पीएचएन सीईटी, दि. ६ ते ७ एमएच नर्सिंग सीईटी, दि. ८ एमएएच-एलएलबी (५ वर्ष), होणार आहेत.
पुनर्परीक्षा / अतिरिक्त सत्र
मे महिन्यातील दि. ९ एमएएच-एमबीए/एमएमएस, दि. १० ते ११ एमएचटी-सीईटी (पीसीबी ग्रुप), दि. १४ ते १७ एमएचटी-सीईटी (पीसीएम ग्रुप) होणार आहे.
TET परीक्षा परवावर! परीक्षाकेंद्रावर मोठी सुरक्षा, उमेदवारांनो! ‘हे’ नियम लक्षात असू द्या
उमेदवारांनो! ‘हे’ नियम लक्षात असू द्या
देशभरातून मोठ्या संख्येने उमेदवार TET परीक्षा (Teacher Eligibility Test) पात्र करण्यासाठी तयारी करत आहेत. शिक्षक पदी काम करण्यास इच्छुक असणारे उमेदवार लाखोंच्या संख्येत या परीक्षेसाठी उपस्थित राहतात. २३ नोव्हेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना दिलेल्या वेळेत परीक्षाकेंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ही परीक्षा राज्यातील ठिकठिकाणी घेतली जात आहे. त्यामुळे राज्य शिक्षण प्रशासनाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था केली आहे.






