कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेच्या निवडणूकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरचंद्रपवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या विरोधात शिवसेनेनं शड्डू ठोकलायं.आज अर्ज माघार घेण्याची मुदत संपली. त्यामुळे अर्ज माघार घेण्यासाठी दबाव येत असल्याने सहलीला गेलेले शिवसेनेचे उमेदवार अखेर कागल इथं परतलेतं.. यावेळी सहलीवरून परतलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून कागल इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..शिवाय माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला..दरम्यान आमचे उमेदवार हे अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेले होते आणि देवदर्शनाला जाण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही..कागल नगरपालिकेची निवडणूक भयमुक्त नाही..त्यामुळे आम्ही त्यांना आधार देण्यासाठी आलो आहे..आमचे सगळे उमेदवार ताकतीने प्रचार करतील आणि तालुक्यातील मंडलिक गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे कागल मध्ये ठाण मांडतील असा विश्वास शिवसेनेचे युवा नेते विरेंद्र मंडलिकांनी म्हटलंयं..