फोटो सौजन्य: @DaggashAutos (X.com)
जपानी ऑटो कंपनी टोयोटाने आपल्या प्रसिद्ध लक्झरी सेडान टोयोटा कॅमरीचे 2025 मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. 48 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह आलेली ही कार अनेक अपग्रेड्ससह सादर करण्यात आली असून तिच्यात लेटेस्ट हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. ही कार आधीच जागतिक बाजारात उपलब्ध होती, मात्र भारतीय ग्राहकांसाठी आता ती अधिक चांगल्या स्वरूपात सादर झाली आहे.
टोयोटा कॅमरी TNGA-K (Toyota New Global Architecture) या प्रगत प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्ममुळे कारचे वजन संतुलित राहते आणि राइड क्वालिटीही उत्तम मिळते. नवीन कॅमरीच्या लूकमध्ये अनेक बदल करण्यात आले असून ती अधिक स्पोर्टी, एलिगंट आणि एरोडायनामिक बनली आहे. समोर नवीन ग्रिल, स्लीक एलईडी हेडलॅम्प्स आणि आधुनिक टेल लॅम्प डिझाइन यामुळे गाडी अधिक प्रीमियम दिसते.
अख्खं मार्केट आता आपलंय ! Tata च्या ‘या’ कारने June 2025 मध्ये सर्वच ऑटो ब्रँड्सना दिली धोबीपछाड
टोयोटा कॅमरीमध्ये 2.5-लिटरचे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा समावेश असलेल्या हायब्रिड सेटअपचा वापर करण्यात आला आहे. या यंत्रणेचे एकूण पॉवर आउटपुट सुमारे 230 एचपी आहे. कंपनीनुसार, ही नवीन सिस्टम मागील मॉडेलपेक्षा 4% अधिक पॉवर देते आणि मायलेजमध्येही सुमारे 30% वाढ झाली आहे. यामुळे ही कार फॉर्च्युनरसारख्या एसयूव्हीला टक्कर देण्यास सक्षम आहे.
कारमध्ये 12.3 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे, जो वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतो. त्याशिवाय 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, प्रीमियम ऑडिओ सिस्टम, वेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ आणि ॲम्बिएन्ट लाईटिंगसारखी फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत.
अयोsss ! ‘ही’ आहे सर्वात पातळ कार, 2 सीट्स, 4 चाकं आणि रुंदी 19 इंच, व्हिडिओ पाहून चाटच पडाल
टोयोटा कॅमरी 2025 मध्ये 9 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स, प्री-कोलिजन सिस्टम, अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेसिंग असिस्ट, रोड साइन रेकग्निशन आणि पादचारी ओळख यांसारखी सेफ्टी फीचर्स आहेत. ही कार केवळ लक्झरी नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य देते.
टोयोटा कॅमरी 2025 हे लक्झरी, परफॉर्मन्स आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही कार एक प्रीमियम आणि स्मार्ट निवड ठरू शकते, विशेषतः जे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित वाहन शोधत आहेत.