Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..

BAMS vs BHMS course details : बारावी (PCB) नंतर एमबीबीएस मिळाले नाही तर काळजी करू नका. BAMS आणि BHMS या दोन्ही कोर्सेसची पात्रता, अभ्यासक्रम, पगार आणि प्रवेशाबद्दलची संपूर्ण माहिती वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 22, 2026 | 11:48 AM
BAMS vs BHMS

BAMS vs BHMS

Follow Us
Follow Us:

BAMS vs BHMS course details : बारावीनंतर जर एमबीबीएसमध्ये सीट मिळाली नाही, तर अजिबात निराश होऊ नका. वैद्यकीय क्षेत्रात नाव आणि ओळख निर्माण करण्यासाठी इतर अनेक उत्तम मार्ग देखील उपलब्ध आहेत. भारतामध्ये अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजेच आयुष (AYUSH) क्षेत्राची बाजारपेठ अत्यंत वेगाने वाढरत आहे. बीएएमएस (आयुर्वेद) आणि बीएचएमएस (होमियोपॅथी) हे २ सर्वात पसंतीचे डॉक्टर कोर्सेस म्हणून पुढे आले आहेत. या दोन्ही पदव्या नावापुढे डॉ. (Dr.) लावण्याचा आणि उपचार करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार देतात.

अनेकदा विद्यार्थी या गोंधळात पडतात की, आखिर BAMS आणि BHMS पैकी त्यांच्या करिअरसाठी काय चांगले ठरेल? या दोन्ही कोर्सेसचा कालावधी ५.५ वर्षे आहे आणि दोन्हीमध्ये प्रवेश नीट यूजी स्कोअरच्या आधारावरच मिळतो. तरीही शिकण्याची पद्धत, उपचाराचे सिद्धांत, सरकारी नोकरी आणि क्लिनिक सुरू करण्याच्या संधी यामध्ये मोठा फरक आहे. वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यापूर्वी BAMS आणि BHMS कोर्समध्ये काय फरक आहे आणि तुम्ही कशामध्ये प्रवेश घेतला पाहिजे, हे जाणून घ्या.

BAMS vs BHMS अभ्यासक्रम: कोणत्या वैद्यकीय कोर्समध्ये काय शिकावे लागते?

BAMS (आयुर्वेद): यामध्ये प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांच्या सोबतीने मॉडर्न बायोलॉजी, ॲनाटॉमी आणि हर्बल मेडिसिनचे शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे BAMS मध्ये बेसिक सर्जरीचे प्रशिक्षण देखील दिले जाते.

BHMS (होमियोपॅथी): हा कोर्स होमियोपॅथीच्या ‘Like Cures Likes’ या सिद्धांतावर आधारित आहे. यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून आजार मुळापासून संपवण्याचे मार्ग आणि सूक्ष्म औषधांचा म्हणजेच मायक्रो मेडिसिनचा अभ्यास करून घेतला जातो.

BAMS पास झाल्यानंतर करिअरचे मार्ग खूप विस्तृत आहेत. तुम्ही स्वतःचे आयुर्वेदिक क्लिनिक किंवा हॉस्पिटल सुरू करू शकता. याशिवाय कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, मेडिकल ऑफिसर आणि वेलनेस सेंटरमध्ये देखील यांची मोठी मागणी आहे. पतंजली, डाबर आणि हिमालय सारख्या कंपन्यांमध्ये संशोधनाची संधी देखील मिळते. BHMS नंतरही तुम्ही प्राइव्हेट क्लिनिक चालवू शकता. आयुष हॉस्पिटल, होमियोपॅथिक रिसर्च कौन्सिल आणि फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये होमियोपॅथिक कन्सल्टंटची खूप मागणी असते.

BAMS आणि BHMS साठी भारताची टॉप महाविद्यालये

BAMS साठी:

  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), नवी दिल्ली
  • फॅकल्टी ऑफ आयुर्वेद, BHU वाराणसी
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (NIA), जयपूर.
Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!

BHMS साठी:

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपॅथी (NIH), कोलकाता
  • नेहरू होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली
  • शासकीय होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज, लखनौ.

BAMS vs BHMS पगार: BAMS की BHMS, कोणती कोर्स मिळवून देणार जास्त पगार?

सुरवातीच्या काळात BAMS फ्रेशर्सना खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात ३५,००० ते ५०,००० रुपये महिना सहज मिळू शकतात. अनुभव वाढल्यावर किंवा स्वतःचे क्लिनिक सुरू केल्यावर ही कमाई १ लाखाच्या वर जाते. दुसरीकडे, BHMS पदवीधरांचे सुरुवातीचे वेतन ३०,००० ते ४५,००० रुपये प्रतिमहा असते. होमियोपॅथीमध्ये कमाई बऱ्यापैकी वैयक्तिक क्लिनिक आणि रुग्णांच्या विश्वासावर अवलंबून असते.

१० वीत मिळाले होते फक्त ५४% गुण; मग कसा मिळवला IIT Bombay मध्ये प्रवेश? जाणून घ्या जैनेंद्रजीतची यशोगाथा

कोणत्या वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश घ्यावा?

जर तुमची आवड नैसर्गिक औषधी वनस्पती, जीवनशैलीशी संबंधित आजारांवर उपचार आणि थोड्याफार सर्जरीमध्ये असेल तर BAMS कोर्स सर्वोत्तम आहे. परंतु, जर तुम्हाला सूक्ष्म औषधे, साईड-इफेक्ट नसलेले उपचार आणि संशोधनामध्ये रस असेल तर BHMS कोर्स निवडणे अधिक बुद्धिमत्तेचा निर्णय ठरेल.

Web Title: Bams vs bhms career options after pcb marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • course
  • education
  • Medical Admission

संबंधित बातम्या

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
1

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 
2

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या
3

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
4

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.