Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

Drought Affected Students Exam Fee: राज्यातील दुष्काळी २६५ तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे आदेश आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 13, 2026 | 03:42 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
  • विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई
  • उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विद्यापीठ प्रशासनाला निर्देश
  • विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून शासनाचा दिलासा देण्याचा प्रयत्न
Drought Affected Students Exam Fee : राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून शासनाचा दिलासा देण्याचा प्रयत्न

शासनाच्या निर्देशांचे पालन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी. तसेच, शासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची दखल घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना दिलासा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Art Exhibition: कलेचा अनोखा संगम! जे. जे. कॉलेजमध्ये सजले राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन; त्वरित भेट द्या

Web Title: Drought affected students exam fee waiver maharashtra 2026 sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • drought news
  • education
  • Exam

संबंधित बातम्या

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत
1

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर
2

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर

Scholarship Renewal 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्कॉलरशिप रिन्यूअलसाठी अर्ज आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार
3

Scholarship Renewal 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्कॉलरशिप रिन्यूअलसाठी अर्ज आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
4

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.