कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ (Rama Raghav) मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण[ प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला आहे.
त्याचसोबत आता या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप (veena jagtap) एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे. रमा राघवचा सुरू झालेला वनवास आणि त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचे एक नवे पात्र मालिकेत प्रवेश करत आहे.
लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर पाठोपाठ वीणाचा या मालिकेतील प्रवेश प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे. कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणाने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होत आणि बिग बॉसमधून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.त्यानंतर पुन्हा एकदा वीणा कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
वीणाची नक्की कोणती भूमिका आहे ? रमा राघवच्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडणार? हे गुलदस्त्यात असून त्याची उत्तरे ‘रमा राघव’मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर मिळणार आहेत.
Web Title: Big boss fame veena jagtap will seen in rama raghav nrps