mukul roy
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष(BJP National Vice President) मुकुल रॉय(Mukul Roy) यांची आज घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या(West bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश(Mukul Roy Join Trunmul Congress) केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता परत भाजपाला मोठा झटका बसला आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी म्हटले आहे की, “मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात महत्वाची भूमिका निभावतील, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
I have joined TMC today. In the present circumstances, no one will stay in Bharatiya Janata Party: Mukul Roy on joining TMC pic.twitter.com/w1hE25LXjV — ANI (@ANI) June 11, 2021
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या हाती आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपावासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले.आहे त्यामध्ये मुकुल रॉय यांचे नाव आघाडीवर होते. तसेच, रजीब बंदोपाध्याय यांच्यासह विधानसभेच्या माजी उपाध्यक्षा सोनाली गुहा यांच्या नावाची देखील चर्चा आहे.