शेजारच्या पती-पत्नीमधील वाद सोडवणं बेतलं जीवावर; चाकूने वार करून गळाच कापला
नागपूर : जुन्या वादातून दोघांनी मिळून कॅबचालक युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतील माजरी परिसरात घडली. याप्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मृत तरूण आणि आरोपी एकाच वसाहतीतील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
यश गोनेकर (वय 21, रा. म्हाडा क्वॉर्टर, कपिलनगर) असे मृताचे नाव आहे. शेख अरबाज शेख ईकबाल आणि असलम ऊर्फ गुड्डू मकसूद अन्सारी अशी आरोपींची नावे असून, तेसुद्धा म्हाडा कॉलोनीतील रहिवासी आहेत. एकाच भागातील रहिवासी असल्याने ते एकमेकांचेही परिचितही आहेत. यशविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. गुड्डूसुद्धा चोरटा आहे. पूर्वी दोघे मिळून चोऱ्या करत असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून यशने ओलामध्ये कार चालविणे सुरू केले. गुड्डूचा मित्र असणाऱ्या अरबाजला तो नेहमीच त्रास देत होता. दिसेल तिथे टपली मारायचा. यावरून काही दिवसांपूर्वी यश आणि अरबाज यांच्यात भांडणही झाले होते. त्यावेळी आरबाजने यशच्या घरी जाऊन त्याची माफी मागितली होती. गुरुवारी रात्री यशला ट्रीप लागली. यामुळे तो कार घेऊन घराबाहेर पडला. रात्री 12.30 वाजताच्या सुमारास माजरी येथील फरदीन सेलिब्रेशन लॉनजवळ थांबला असताना दोन्ही आरोपीही तिथे पोहोचले.
यशने अरबाजला पुन्हा डिवचने सुरू केले. नेहमीचा त्रास एकदाचा संपवायचा या निर्धाराने दोघांनीही त्याला पकडून मारहाण सुरू केली. जवळील चाकू काढून मांडी आणि मागच्या भागात कमरेखाली चाकूने भोसकले. यात यश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी प्रथम मेयो रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांकडून कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, त्यातच त्याचा मृत्यू झाला.