Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाले, "सलीम जावेद यांच्याशी संपर्क...'
पुणे: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) सडकून टिका करत मतदाराची चोरी झाली असल्याचं सांगितल.याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की अलीकडच्या काळात राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आहे. ही स्क्रिप्ट अतिशय मनोरंजनात्मक आहे आणि ती सगळीकडे म्हणत आहे पण याच्याने मनोरंजना पलीकडे काहीच होत नाहीये. सगळ्या गोष्टी त्या कपोकल्पीत मांडत आहे, असे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित विविध कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधी एकीकडे म्हणत आहे की वोटर लिस्ट मध्ये प्रोब्लेम आहे आम्ही देखील एवढ्या वर्षांपासून सांगत आहोत.राहुल गांधी यांना कॉम्प्रिवेंसी रिव्हिजन माहीत नसून त्यांना केवळ आपल्या हरण्याच काहीतरी कारण शोधायचं आहे आणि त्याने ते काढलं आहे.
पुणे महापालिका आयुक्त व पुणे पोलीस आयुक्त यांनी शहरातील वाहतुक बाबत आजच्या कार्यशाळेत सादरीकरण केले. यात पुणे शहरातील वाहतुकीचा वेग हा प्रति तास 19 कि.मी. इतका आहे. तर कधी तो प्रतितास 12 कि.मी. होत असल्याचे सांगितले. परंतु महानगरात वाहतुकीचा वेग हा प्रतितास 30 कि.मी. पर्यंत हवा आहे. त्यादृष्टीने येत्या डिसेंबर, २०२६ पर्यंत हा वेग ३० कि.मी. प्रतितास कसा नेता येईल यासाठी काही उपाययोजना नियोजित केल्या आहेत. टप्प्या टप्प्याने शहरातील ३५ बॉटल लेक, मिसिंग लिंक काढून यातून पुण्यातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.