Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावाचा गॅझेटमध्ये जन्म, ग्रामस्थ मात्र अंधारात! मणेराजूरीत वादळी ग्रामसभा

मणेराजूरी (ता. तासगाव) येथील लुगडेवाडी (भोसलेनगर) परिसराला स्वतंत्र नवे महसूली गाव म्हणून घोषित करणारी अधिसूचना ग्रामस्थांच्या माहितीत न आणता थेट राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने गावात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2025 | 01:38 PM
गावाचा गॅझेटमध्ये जन्म, ग्रामस्थ मात्र अंधारात! मणेराजूरीत वादळी ग्रामसभा

गावाचा गॅझेटमध्ये जन्म, ग्रामस्थ मात्र अंधारात! मणेराजूरीत वादळी ग्रामसभा

Follow Us
Close
Follow Us:
  • गावाचा गॅझेटमध्ये जन्म
  • ग्रामस्थ मात्र अंधारात!
  • मणेराजूरीत वादळी ग्रामसभा
तासगाव/प्रवीण शिंदे : मणेराजूरी (ता. तासगाव) येथील लुगडेवाडी (भोसलेनगर) परिसराला स्वतंत्र नवे महसूली गाव म्हणून घोषित करणारी अधिसूचना ग्रामस्थांच्या माहितीत न आणता थेट राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने गावात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे. अचानक ‘नवीन गावात’ आपली जमीन गेल्याचा धक्का बसताच लुगडेवाडी आणि आसपासच्या आठही वस्त्यांतील ग्रामस्थ संतप्त झाले. गुरुवारी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत यावरून जोरदार वाद झाला आणि शेवटी बहुमताने हा आदेश रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला.

ऑक्टोबरमध्येच गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेबाबत कोणतीही माहिती, हरकतीची नोटीस अथवा चर्चा न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. २२६ कुटुंबांच्या सुमारे ५०० गट नंबरच्या जमिनी नव्या गावात टाकल्याने या वस्त्यांमध्ये मोठा संभ्रम आणि संताप निर्माण झाला. “आपल्याच जमिनी कोणालाही कळवळ्याविना दुसऱ्या महसूली गावात?” असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान, भोसलेनगरच्या प्रतिनिधींनी परिस्थिती स्पष्ट करत १९८६ पासून ‘लुगडेवाडी’ नाव प्रचलित असले तरी दप्तरी नाव ‘भोसलेनगर’ असल्यामुळे अधिकृत गावनाम नोंदणीसाठी महसूली गावाचा दर्जा आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचे त्यांनी नमूद केले; मात्र या प्रक्रियेत वस्ती भागातील नागरिकांना विश्वासात न घेतल्याने गैरसमज वाढल्याचे मान्य केले.

तणावपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेनंतर ग्रामसभेने ‘नवीन महसूली गाव’ आदेश रद्द करण्याचा ठराव मोठ्या बहुमताने मंजूर केला. तसेच भविष्यात ‘भोसलेनगर’ या नावासाठी नव्या प्रस्तावाची शिस्तबद्ध आणि पारदर्शी प्रक्रिया राबवावी, अशी सूचना ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.

या बैठकीस ग्राममहसूल अधिकारी प्रकाश पांढरे, ग्रामसेवक विनय थोरवत, सरपंच सारिका जमदाडे, उपसरपंच सचिन जमदाडे, सतीश पवार, शशिकांत जमदाडे, तानाजी लांडगे, दिलीप जमदाडे, अरुण पवार, रामचंद्र लांडगे, प्रदीप पवार, बाबासाहेब जमदाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Villagers were seen getting angry at the gram sabha in manerajuri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Tasgaon News

संबंधित बातम्या

तासगाव नगरपालिकेत पंचरंगी महासंग्राम; रोहित पाटील अन् संजय पाटलांची प्रतिष्ठा पणाला
1

तासगाव नगरपालिकेत पंचरंगी महासंग्राम; रोहित पाटील अन् संजय पाटलांची प्रतिष्ठा पणाला

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
2

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा सर्व कारभार अमित शहा पाहतात; सपकाळांची टीका
3

देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा सर्व कारभार अमित शहा पाहतात; सपकाळांची टीका

तासगावमध्ये शक्तिसंघर्ष तीव्र, सर्वच पक्षांमध्ये नाट्यमय घडामोडी; नेमकं काय घडतंय?
4

तासगावमध्ये शक्तिसंघर्ष तीव्र, सर्वच पक्षांमध्ये नाट्यमय घडामोडी; नेमकं काय घडतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.