
Congress leaders remaining silent joining the BJP or the AIMIM Nanded News
Nanded Congress News : नांदेड : नांदेड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कग्रेिसच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाची हिमनिद्रा अजूनही संपलेली दिसून येत नाही. कधी सत्ताधारी पक्षांना आव्हान देणारी काँग्रेस आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत असून, पक्षांतर्गत गळती, नेतृत्वावरचा अविश्वास आणि कार्यकत्यांमधील नाराजी यामुळे काँग्रेसचा राजकीय किल्ला कोसळण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील काँग्रसचे नेते तथा खासदार रवींद्र चव्हाण यांचे मौन बरेच काही सांगून जात आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने अजूनही आपली हिमनिद्रा सोडलेली दिसून येत नाही.
काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघांमध्येच आता असंतोष उफाळून येत आहे. महापालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर उपमहापौर, सभापती, नगरसेवक माणून काम केलेले मुस्लिम समाजातील नेते आणि कार्यकर्ते उघडपणे एमआयएमच्या पाठीशी उभे राहत आहेत. रशीद यांचा एमआयएममध्ये प्रवेश हा केवळ सुरुवात मानली जात असून, येत्या काळात ऑपरेशन एमआयएम’ अधिक वेगाने रावकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा : अटल बिहारी वाजपेयींनी का नाही केले लग्न? प्रेम केले व्यक्त पण राहिले अपूर्ण…वाचा Love Story
काँग्रेस नेतृत्वाकडून अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रियेत त्यांना डावलले जाणे आणि कायमस्वरूपी केवळ “मतपेटी” म्हणून वापरले कारणांमुळे त्यांच्या विरोधात तीव्र नाराजी तयार झाली आहे. हीच पोकळी एमआयएम प्रभावीपणे भरुन काढताना दिसत आहे. दुसरीकडे, काँग्रेसची गळती फक्त एमआयएमपुरती मर्यादित नाही. माजी महापौर जयश्री पावडे, निलेश पावडे, उपमहापौर सतीश देशमुख यांचा भाजपात प्रवेश, तसेच दररोज काँग्रेसमधून भाजपात होणारे स्थलांतर, हे काँग्रेसचे अपयश आहे. भाजप ‘विजयी लाट’ आणि सत्तेचे गणित मांडत कार्यकत्यांना आकर्षित करत असताना काँग्रेसकडे मात्र देण्यासारखा ठोस अजेंडा नाही.
हे देखील वाचा : भाजपच्या निष्ठावंतांना राहिली नाही किंमत? तीव्र विरोधानंतरही पक्षप्रवेश पार, देवयानी फरांदे भावूक
दुहेरी कात्रीत काँग्रेस
आज नांदेडच्या राजकारणात काँग्रेस दोन्ही बाजूंनी अडचणीत आली आहे. अल्पसंख्याक मतदार एमआयएमकडे झुकत आहेत तर पारंपरिक एक काँग्रेस नेते भाजपाच्या आश्रयाला जात आहेत, या दुहेरी कात्रीत काँग्रेसचे राजकीय वजन झपाट्याने कमी होत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये ‘आऊटगोइंग सुरू असताना, पक्ष नेतृत्व अजूनही आत्मपरीक्षणाऐवजी मौन बाळगून आहे. हे मौन आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी घातक ठरणार की काय? असा प्रश्न आता नांदेडच्या राजकीय वर्तुळात उघडपणे विचारला जात आहे. काँग्रेसच्या बॅनरखाली महापालिकेत उपमहापौर सभापती नगरसेवक म्हणून कार्यकाळ गाजवलेले बहुतांश मुस्लिम पुढारी एमआयएम पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी नगरसेवक अब्दुल रशीद यांनी त्यांच्या सहकार्यासह एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसात काँग्रेसमधील अनेक मुस्लिम पुढारी काँग्रेस सोडणार असल्यामुळे काँग्रेस रिकामी होते का हे पाहणे? औत्सुक्याचे ठरणार आहे.