Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे; काँग्रेसचे आवाहन

सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावे व गॅस सिलेंडर सहजपणे उपलब्ध होतील यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 12, 2026 | 04:20 PM
गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे; काँग्रेसचे आवाहन

गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे; काँग्रेसचे आवाहन

Follow Us
Follow Us:

त्र्यंबकेश्वर : आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देशात स्वातंत्र्य चळवळ सुरु असताना महायुद्धाला सामोरे जावे लागले, स्वातंत्र्यानंतरही जगाच्या अनेक भागात अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले पण त्यावेळी काँग्रेस सरकारने, तत्कालीन पंतप्रधान यांनी राष्ट्र म्हणून सर्वांशी संवाद साधत ठोस धोरण, योग्य नियोजन यामुळे गॅस वा इंधनाच्या तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. पण आज भाजपा सरकारकडे अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतेही धोरण नाही, संवाद नाही, सरकारने सर्व घटकांशी संवाद साधून त्यातून मार्ग काढला पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, माझ्यावर फडणवीस व भाजपाचे नेते अत्यंत खालच्या पातळीवरची टिका करतात त्याचे आश्चर्य वाटत नाही कारण फडणवीस व भाजपा विचार हा बहुजनांचे हक्क नाकारणारा आहे. हजारो वर्षापासूनचा हा संघर्ष आहे, त्यांची मानसिकता बहुजनविरोधी आहे. याच विचाराचा सामना आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही करावा लागला, मी तर पामर आहे. त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून मी फडणवीस यांच्यासाठी परमेश्वराकडे सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या दोन ओळी सांगतो, “छोटे दिल से कोई बडा नही होता, तुटे दिल से कोई खडा नही होता”, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

विधानभवनात बॉम्ब असल्याचा ई मेल आला हे ऐकून राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे याचा प्रत्यय येतो. विधान भवन जर सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत पोलीस सध्या खलाचे रक्षण करत आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

गॅस तुटवड्याविरोधात राज्यभर काँग्रेसचे आंदोलन

सरकारने अचानक गॅसच्या किमती वाढवल्या व दुसरीकडे युद्धामुळे गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावे व गॅस सिलेंडर सहजपणे उपलब्ध होतील यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the government over gas shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
3

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
4

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.