Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ‘हा’ नाराज नेता सोडणार काँग्रेसचा ‘हात’? शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी मला राज्यसभेची उमेदवारीही देऊ केली होती. पण महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2026 | 12:57 PM
Rajya Sabha Election : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई

Rajya Sabha Election : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुण्यातील काँग्रेस नेते आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. रोहित टिळक हे टिळक कुटुंबातील राजकीय वारसा असलेले नेते म्हणून ओळखले जातात. लवकरच ते काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना टिळक म्हणाले, 3 वर्षांपूर्वी त्यांच्या संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचा टिळक पुरस्कार देण्यात आला होता. त्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाने काहीसे अंतर ठेवण्यास सुरुवात केली. या संदर्भात आपण अनेकदा काँग्रेस हायकमांडपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. यादरम्यान माझी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक चर्चा झाली.

एकनाथ शिंदे यांच्यात सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता दिसतो. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करायचा हे निश्चित झाले. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी मला राज्यसभेची उमेदवारीही देऊ केली होती. पण महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली.

दरम्यान, शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा आणि त्यांचा टिळक कुटुंबाशी असलेल्या स्नेहाचा विचार करून आपण राज्यसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतली. राज्यसभेसाठी आपण अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आता राज्यसभा हुकल्यानंतर रोहित टिळक यांना एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची संधी मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

अनेक निवडणुका पार पडल्या

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 जागांसाठी नेमके सातच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज राहिलेली नाही. बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Web Title: Rohit tilak likely to join eknath shinde shiv sena soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Congress
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

“…स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढणार, काँग्रेसच्या चर्चासत्रात हर्षवर्धन सपकाळ यांचे मोठे वक्तव्य
1

“…स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढणार, काँग्रेसच्या चर्चासत्रात हर्षवर्धन सपकाळ यांचे मोठे वक्तव्य

‘मोदी मस्ट गो! मोदी सरकार नाही तर काँग्रेसच देशाला संकटातून वाचवू शकते,’ यशवंत सिन्हा यांचे मोठे वक्तव्य
2

‘मोदी मस्ट गो! मोदी सरकार नाही तर काँग्रेसच देशाला संकटातून वाचवू शकते,’ यशवंत सिन्हा यांचे मोठे वक्तव्य

मिनाक्षी नटराजन यांचा निवडणूक लढण्याचा हक्क हिरावून घेतला, भाजपमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर…; सपकाळांची टीका
3

मिनाक्षी नटराजन यांचा निवडणूक लढण्याचा हक्क हिरावून घेतला, भाजपमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर…; सपकाळांची टीका

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विलीनीकरण? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; ‘सध्या देश वाचवण्याची गरज…’
4

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विलीनीकरण? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; ‘सध्या देश वाचवण्याची गरज…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.