Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… नाहीतर तुमचीसुद्धा आजीसारखीच गत करू”; भाजप नेत्याची थेट राहुल गांधींना धमकी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका मुलाखतीमध्ये शीख समुदायाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे शीख समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान यावरून आता राजकारण तापले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2024 | 08:11 PM
''... नाहीतर तुमचीसुद्धा आजीसारखीच गत करू''; भाजप नेत्याची थेट राहुल गांधींना धमकी

''... नाहीतर तुमचीसुद्धा आजीसारखीच गत करू''; भाजप नेत्याची थेट राहुल गांधींना धमकी

Follow Us
Close
Follow Us:

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका मुलाखतीमध्ये शीख समुदायाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे शीख समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान यावरून आता राजकारण तापले आहे. काँग्रेसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. दिल्लीतील भाजप नेते आणि माजी आमदार हे राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असा एक व्हिडीओ काँग्रेसने शेअर केला आहे. राहुल गांधींच्या विधानाचा निषेध म्हणून शीख समाजाने सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे .

दिल्ली भाजपचे नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, त्याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. तरविंदर सिंग मारवाह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने तरविंदर सिंग मारवाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

दिल्ली BJP का नेता और पूर्व विधायक, तरविंदर सिंह मारवाह ने आज प्रदर्शन के दौरान कहा: “राहुल गांधी बाज आ जा, नहीं तो आने वाले टाइम में तेरा भी वही हाल होगा जो तेरी दादी का हुआ” BJP का ये नेता खुलेआम देश के नेता प्रतिपक्ष की हत्या की धमकी दे रहा है.@narendramodi जी, अपने… pic.twitter.com/tGisA5dfNu — Congress (@INCIndia) September 11, 2024

काय म्हणाले तरविंदर सिंग मारवाह?

दिल्लीचे माजी आमदार आणि भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरील निदर्शनामध्ये एक वक्तव्य केले. त्यात ते म्हणाले, ”राहुल गांधी वेळीच सावध व्हा. नाहीतर येणाऱ्या काळात तुमची देखील तुमच्या आजीसारखीच गत होईल.” अशा इशारा तरविंदर सिंग मारवाह यांनी दिला. हा व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे . तसेच काँग्रेसने मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या फॅक्टरीचं हे प्रॉडक्ट आहे, असे काँग्रेसने म्हटले आहेच. यावर कारवाई करावीच लागेल , अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या शीख समाजावरील विधानामुळे हा वाद निर्माण झाला आहे. एखाद्या शीख व्यक्तीने भारतात पगडी किंवा हातात कडे घालावे की नाही, एखादी शीख व्यक्ती गुरुद्वारामध्ये जाऊ शकते की नाही. यासाठी ही लढाई असून, केवळ याच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.

Web Title: Congress share video sikh bjp leader death threatens to rahul gandhi after there statement in usa interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 08:11 PM

Topics:  

  • BJP news
  • Congress Party
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Patka : राहुल गांधींकडून राष्ट्रपतींचा अपमान? अनेकदा सांगूनही आसामचा पटाका घालण्याची झिडकारली विनंती
1

Rahul Gandhi Patka : राहुल गांधींकडून राष्ट्रपतींचा अपमान? अनेकदा सांगूनही आसामचा पटाका घालण्याची झिडकारली विनंती

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”
2

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”

Shashi Tharoor upset in Congress : शशी थरुर यांचे कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य; राहुल गांधींकडे फिरवली पाठ
3

Shashi Tharoor upset in Congress : शशी थरुर यांचे कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य; राहुल गांधींकडे फिरवली पाठ

Political News : फक्त नावात गांधी असून चालत नाही तर…! तेजप्रताप यादव यांचा राहुल गांधींवर निशाणा
4

Political News : फक्त नावात गांधी असून चालत नाही तर…! तेजप्रताप यादव यांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.