Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बारामतीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून, नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 07, 2026 | 02:35 AM
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश
Follow Us
Follow Us:

मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा – सुनेत्रा अजित पवार
वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरातील अनेक झाडे पडली उन्मळून 
 उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यावर भर

मुंबई: बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून काही झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी विशेषतः मुळासकट उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यावर भर देत, अशा झाडांचे मोठ्या क्रेनच्या सहाय्याने स्थलांतर करून आवश्यक ती छाटणी केल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यास सांगितले. तसेच आगामी काळात वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता रस्त्यालगतच्या मोठ्या वृक्षांची आवश्यक ती छाटणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशाही सूचना दिल्या.

Baramati Rain : बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली

शहरातील तसेच तालुक्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत तहसीलदारांनाही त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बारामतीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून, नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान

बारामती शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक ठिकाणी केळी, ऊस यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण दिन दिवशीच अनेक झाडे कोसळल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान वादळी वाऱ्यासह बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र यामध्ये नुकसानच अधिक झाले. बारामती शहरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बारामती शहरातील सातव चौक शेजारील शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील अनेक झाडे कोसळली, यामध्ये काही वाहनांवर झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले.

Web Title: Dcm sunetra pawar said immediately restore normalcy in the stormaffected areas of baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • baramati news
  • Rain News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचे दमदार कमबॅक; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला
1

दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचे दमदार कमबॅक; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
2

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
3

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा
4

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.