‘सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’; दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे : दिवाळीच्या शुभसंध्येला आयोजित करण्यात आलेला ‘दीप संध्या’ हा मराठी सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. मराठी संगीत, मोहक स्वर आणि शब्दसुमनांनी सजलेल्या निवेदनाने सायंकाळी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचा आनंद घेतला. आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर व ओंकार ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात रंगलेल्या ‘दिप संध्या’ कार्यक्रमाचे संगीत संयोजन संगीतकार निनाद सोलापूरकर यांनी केले होते. गायक अक्षय घाणेकर, अभिजीत वाडेकर, तसेच गायिका अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांनी आपल्या सुमधुर गायनाने दिवाळीच्या उत्सवाला सुरांचा सुंदर साज चढवला. स्नेहल दामले यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला ओघवतेपणा मिळाला.
वादनसाथ नितीन शिंदे (तबला), मंदार देव (कीबोर्ड), नागेश भोसेकर(पखवाज), अभिषेक काटे (वेस्टर्न रिदम) आणि राधिका अंतुरकर (गिटार )यांनी सुरेल साथ देत कार्यक्रमाची लय अधिक खुलवली. आयोजनासाठी एकनाथ बुरसे, सचिन रणसिंग, निलेश खजिनदार, प्रकाश खडतरे, संतोष जमदाडे, रवींद्र बलकवडे, हनुमंत दगडे, दिलीप ठोंबरे, संतोष चव्हाण यांच्यासह राघवेंद्र मानकर मित्र परिवार, ओंकार ग्रुप आणि वर्तक बाग परिवाराच्या सदस्यांनी सहकार्य केले.
हे सुद्धा वाचा : ग्रंथालय संचालनालयाची दिवाळी अंक यादी जाहीर; पुण्यातून तब्बल 82 अंकांचा समावेश