Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम घाटात वाघपतंगाच्या नव्या वंशाचा शोध; ‘अंतरम् इडुक्की’ने उलगडली अज्ञात उत्क्रांती शाखा

ही प्रजाती केरळमधील इडुक्की जिल्ह्यात आढळून आली आहे. पश्चिम घाटातील विविध भागांत व्यापक पतंग सर्वेक्षण करण्यात आले असतानाही हा पतंग केवळ इडुक्कीमध्येच आढळल्याने तो अत्यंत दुर्मिळ असल्याचे संशोधकांचे मत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 21, 2026 | 02:35 AM
पश्चिम घाटात वाघपतंगाच्या नव्या वंशाचा शोध; ‘अंतरम् इडुक्की’ने उलगडली अज्ञात उत्क्रांती शाखा
Follow Us
Follow Us:
  • पश्चिम घाटात वाघपतंगाच्या नव्या वंशाचा शोध
  • ‘अंतरम् इडुक्की’ने उलगडली अज्ञात उत्क्रांती शाखा
  • पुण्यातील शास्त्रज्ञांची कामगिरी
सुनयना सोनवणे /पुणे: भारतीय प्राणी सर्वेक्षण (झेडएसआय)च्या पुणे येथील पश्चिम प्रादेशिक केंद्रातील शास्त्रज्ञांनी पश्चिम घाटातून वाघपतंगाच्या (टायगर मॉथ) नव्या वंश आणि नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ‘अंतरम् इडुक्की’ असे या (Navarashtra Special) नव्या प्रजातीचे नाव असून, या शोधामुळे पश्चिम घाटातील अद्याप नोंद न झालेल्या कीटकवैविध्याचा आणखी एक पैलू समोर आला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘जर्नल ऑफ द लेपिडॉप्टेरिस्ट्स सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

झेडएसआयच्या पुणे केंद्रातील डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावते, लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे माजी वरिष्ठ क्युरेटर डॉ. अल्बर्टो झिली, झेडएसआयच्या कोझिकोड येथील पश्चिम घाट प्रादेशिक केंद्राचे एम. डी. जाफर पालोट आणि केरळचे स्वतंत्र पतंग अभ्यासक बाळकृष्ण वलप्पिल यांनी संयुक्तपणे हा शोध लावला.

संशोधकांनी सांगितले की, ‘अंतरम्’ हा पूर्णपणे नवा वंश असून संस्कृतमधील ‘अंतरम्’ या शब्दाचा अर्थ ‘फरक’ किंवा ‘भिन्नता’ असा आहे. वाघपतंगांच्या आर्क्टीइनी उपकुलात नवीन वंशाचे वर्णन होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. अशा शोधांमुळे पूर्वी अज्ञात असलेल्या उत्क्रांतीच्या शाखांचा उलगडा होतो.

International Tennis Day : 12 व्या शतकातील फ्रान्स ते आजचे जागतिक साम्राज्य; पाहा टेनिस या लोकप्रिय रॅकेट गेमचा रंजक प्रवास

ही प्रजाती केरळमधील इडुक्की जिल्ह्यात आढळून आली आहे. पश्चिम घाटातील विविध भागांत व्यापक पतंग सर्वेक्षण करण्यात आले असतानाही हा पतंग केवळ इडुक्कीमध्येच आढळल्याने तो अत्यंत दुर्मिळ असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्याच्या अळीची खाद्यवनस्पती आणि जीवनचक्राबाबत अद्याप माहिती उपलब्ध नसल्याने या प्रजातीवर पुढील संशोधनाची आवश्यकता आहे.

जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या पश्चिम घाटातील इडुक्की परिसर सध्या अधिवासाचा ऱ्हास, अनियंत्रित पर्यटन, हवामान बदल आणि भूस्खलनाच्या वाढत्या घटनांमुळे दबावाखाली आहे. अशा परिस्थितीत नव्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचे संशोधकांनी नमूद केले.

World Refugee Day 2026 : घर सुटलं, पण आशा जिवंत! वाचा युद्ध आणि संकटांशी लढणाऱ्या लाखो विस्थापितांच्या संघर्षाची कहाणी

‘पतंग हे परिसंस्थेतील महत्त्वाचे परागीभवन करणारे जीव असून अनेक पक्षी, वटवाघुळे आणि इतर प्राण्यांसाठी अन्नस्रोत म्हणूनही कार्य करतात. पर्यावरणातील बदलांचे संकेत देणारे जैविक निर्देशक म्हणून त्यांना विशेष महत्त्व आहे. ‘अंतरम् इडुक्की’ चा शोध भारतातील कीटकवैविध्याचा मोठा भाग अद्याप संशोधनाच्या प्रतीक्षेत असल्याचे दर्शवते.’
– डॉ. अपर्णा कलावटे,
वैज्ञानिक ई, भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग, पुणे

Web Title: Discovery a new genus clubtail dragonfly in western ghats antaram idukki reveals an unknown evolutionary branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • navarashtra special
  • pune news
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

पुणेकरांसाठी दिलासा! पीएमआरडीए अन् महारेलचा ऐतिहासिक करार; रेल्वेफाटक मुक्तीचा मार्ग मोकळा
1

पुणेकरांसाठी दिलासा! पीएमआरडीए अन् महारेलचा ऐतिहासिक करार; रेल्वेफाटक मुक्तीचा मार्ग मोकळा

. International Tennis Day : 12 व्या शतकातील फ्रान्स ते आजचे जागतिक साम्राज्य; पाहा टेनिस या लोकप्रिय रॅकेट गेमचा रंजक प्रवास
2

. International Tennis Day : 12 व्या शतकातील फ्रान्स ते आजचे जागतिक साम्राज्य; पाहा टेनिस या लोकप्रिय रॅकेट गेमचा रंजक प्रवास

World Refugee Day 2026 : घर सुटलं, पण आशा जिवंत! वाचा युद्ध आणि संकटांशी लढणाऱ्या लाखो विस्थापितांच्या संघर्षाची कहाणी
3

World Refugee Day 2026 : घर सुटलं, पण आशा जिवंत! वाचा युद्ध आणि संकटांशी लढणाऱ्या लाखो विस्थापितांच्या संघर्षाची कहाणी

लोकांच्या आरोग्याशी खेळ? प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर; AQI डेटा गायब
4

लोकांच्या आरोग्याशी खेळ? प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर; AQI डेटा गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.