Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकांच्या आरोग्याशी खेळ? प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर; AQI डेटा गायब

हवामान बदल, वाढते शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या, धूळ, औद्योगिक प्रदूषण आणि वाढती उष्णता यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 08:29 PM
लोकांच्या आरोग्याशी खेळ? प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर; AQI डेटा गायब

लोकांच्या आरोग्याशी खेळ? प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर; AQI डेटा गायब

Follow Us
Follow Us:

प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर
हवेच्या गुणवत्तेची माहिती पंधरा दिवसांपासून उपलब्ध नाही
सरकारी यंत्रणांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा

सुनयना सोनवणे / नवराष्ट्र: पुणे शहरातील प्रदूषण वाढत असताना त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर गेली आहे. एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या हवेच्या गुणवत्तेची माहिती गेल्या पंधरा दिवसांपासून उपलब्ध नाही, प्रदूषणावर लक्ष ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी दर्शविणारी सफर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) संकेतस्थळे बंद असल्याने शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) आणि प्रदूषणाची अधिकृत माहिती सार्वजनिक पटलावरून पूर्णपणे गायब झाली आहे.

हवामान बदल, वाढते शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या, धूळ, औद्योगिक प्रदूषण आणि वाढती उष्णता यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शहरातील विविध भागांतील हवेची गुणवत्ता मोजून त्याचा डेटा सार्वजनिक करणाऱ्या या दोन्ही यंत्रणांवर हजारो नागरिक, पर्यावरण अभ्यासक, संशोधन संस्था आणि विद्यार्थी अवलंबून असतात. मात्र, संकेतस्थळे बंद असल्यामुळे सध्या पुण्यातील हवेची गुणवत्ता नेमकी काय आहे, कोणत्या भागात प्रदूषण अधिक आहे आणि नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

पुणे एअर ॲक्शन हबचे रवींद्र सिन्हा म्हणाले, ‘सफरच्या संकेतस्थळावरून मिळणारी दैनंदिन ‘एक्युआय’ची माहिती न मिळणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याची ही सरकारसाठी एक संधीदेखील आहे. शहरात अधिक घनदाट वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रांचे जाळे उभारण्याबरोबरच त्यासाठी बॅकअप आणि खंडित न होणारी व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. तसेच, दरवर्षी कॅलिब्रेशन प्रमाणपत्र असलेल्या कमी खर्चाच्या सेन्सरद्वारे मिळणारा वायू गुणवत्ता डेटा सरकारच्या अधिकृत पोर्टलवर प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्यास नागरिकांना सातत्याने माहिती उपलब्ध होऊ शकेल.’

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

पर्यावरण तज्ञांच्या मते, प्रदूषणाची माहिती सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याने तिची पारदर्शकता आणि सातत्य आवश्यक आहे. पंधरा दिवसांहून अधिक काळ वायू गुणवत्ता माहिती प्रणाली बंद राहणे चिंताजनक असून, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संकेतस्थळे तातडीने सुरू करून बिघाडाचे कारण जाहीर करण्याची मागणी होत आहे.

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

माहिती देण्याचेही वावडे!
या गंभीर बिघाडाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सफर प्रणालीच्या समन्वयकांशी संपर्क साधला असता, ‘संकेतस्थळ पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो,’ एवढेच सांगण्यात आले. मात्र, बिघाडाचे नेमके कारण, डेटा अनुपलब्ध राहण्यामागील कारणे आणि पर्यायी व्यवस्था याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दुसरीकडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद देणे टाळले.

Web Title: Aqi data missing for a fortnight very system monitoring pollution is on ventilator support mpcb pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • MPCB
  • pollution
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.