मुंबई : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी कोणतीही चांगली बातमी नाही. त्यांचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. २६ मार्चपासून आयपीएलचा १५वा सीझन सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. सूर्यकुमार दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान दुखापत झाली
भारतीय दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३-टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमारला दुखापत झाली होती. यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या ३ टी-२० मालिकेतून बाहेर पडला. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यातून बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो.
सूर्यकुमार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे पुनर्वसनात असून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार २ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. तोपर्यंत तो तंदुरुस्त असणे अपेक्षित आहे.
मुंबई इंडियन्सने कायम ठेवले होते
मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मासह चार खेळाडूंमध्ये सूर्यकुमारचा समावेश केला होता. त्याला ८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले होते, तर रोहित शर्माला १६ कोटी, जसप्रीत बुम्मरला १२ कोटी आणि किरोना पोलार्डला ६ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले होते.