Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shaha: ‘…त्यामुळे शहा यांनी राजीनामा द्यावा’; आंबेडकरवादी संघटनांची मागणी, साताऱ्यात निघाला भव्य मोर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत आंबेडकरांवर बोलताना काही विधानं केली होती. त्यावर कॉंग्रेसने अमित शहांनी बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप करत देशभर आंदोलने केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 27, 2024 | 05:00 PM
Amit Shaha: '...त्यामुळे शहा यांनी राजीनामा द्यावा'; आंबेडकरवादी संघटनांची मागणी, साताऱ्यात निघाला भव्य मोर्चा

Amit Shaha: '...त्यामुळे शहा यांनी राजीनामा द्यावा'; आंबेडकरवादी संघटनांची मागणी, साताऱ्यात निघाला भव्य मोर्चा

Follow Us
Close
Follow Us:

सातारा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेली वक्तव्यं निंदनीय आहेत .त्यामुळे राष्ट्रपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना माघारी बोलवावे अशी मागणी साताऱ्यात आंबेडकरवादी संघटनांनी करत  मोर्चा काढला.  या मोर्चामध्ये शेकडो संघटना सदस्य सहभागी झाले होते. अमित शहा यांचा निषेध असो, संविधानाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या .

या आंबेडकरवादी चळवळीचे चंद्रकांत खंडाईत तसेच त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते .शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली या मोर्चामध्ये सहभागी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आंबेडकर वादी संघटनांचे सदस्य राजपथावरून मोर्चा काढत मोती चौकामध्ये आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे येथील वाहतूक एकेरी ठेवण्यात आली होती .मोर्चा मोती चौकातून पुन्हा कर्मवीर पथावरून पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला .

जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या वक्तव्याबाबत माफी मागत नाही तोपर्यंत दलित चळवळीचे कार्यकर्ते हे आंदोलन करतच राहणार अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून त्यांना माघारी बोलवावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल त्यांनी केलेले निंदनीय वक्तव्य माफ करण्यासारखे नाही . त्यांनी तातडीने पदत्याग करावा अशी आग्रही मागणी आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने करण्यात आली.

आंबेडकरांवरील माझं विधान चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर माडलं: अमित शहा

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत आंबेडकरांवर बोलताना काही विधानं केली होती. त्यावर कॉंग्रेसने अमित शहांनी बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप करत देशभर आंदोलने केली होती. त्याला आज अमित शहांनी पत्रकार परिषद प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसने संसदेत झालेल्या चर्चेतील विधानं तोडून मोडून जनतेसमोर मांडली आहेत. भाजपा नेत्यांनी विषय फॅक्ट्ससह मांडला, त्यामुळे काँग्रेस अंबेडकर विरोधी, आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी पक्ष असल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला आणि आणीबाणी लागू करून संविधानाचा अपनान केला, न्यायालयाचा अपमान केल्याचा घणाघात त्यांनी केला.

हेही वाचा: Amit Shah : आंबेडकरांवरील माझं विधान चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर माडलं; काँग्रेसच्या आरोपांवर अमित शहांचं रोखठोक प्रत्युत्तर

अमित शाह म्हणाले, ” काँग्रेसने डॉ. बाबासाहेब अंबेडकरांना निवडणुकीत कसं हरवलं, याची संसदेत चर्चा झाली. काँग्रेसने यासाठी विशेष प्रयत्न केले होते. जिथे भारतरत्न देण्याची गोष्ट येते, तिथे काँग्रेसचे नेते स्वतःला भारतरत्न देत होते, पण बाबासाहेबांना भारतरत्न तेव्हा मिळालं जेव्हा काँग्रेस सत्तते नव्हती. काँग्रेस नेहमीच अंबेडकरांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न करत राहिली.मी त्या पक्षातून येतो जो अंबेडकरांचा कधीच अपमान करू शकत नाही. राज्यसभेत मी जे काही मतं मांडलं, ते काँग्रेसने तोडून मोडून जनतेसमोर मांडलं. काँग्रेसने सत्य चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेहमीच आरक्षणाचा विरोध करत आली आहे.”

 

Web Title: Dr babasaheb ambedkarite organizations march at satara and demand resign to home minister amit shaha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • amit shaha
  • dr babasaheb amdekar
  • Satara News

संबंधित बातम्या

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
1

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
2

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
3

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण
4

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.