माझं विधान चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर माडलं; कॉंग्रेसच्या आरोपांवर अमित शहांचं रोखठोक प्रत्युत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत आंबेडकरांवर बोलताना काही विधानं केली होती. त्यावर कॉंग्रेसने अमित शहांनी बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप करत देशभर आंदोलने केली होती. त्याला आज अमित शहांनी पत्रकार परिषद प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसने संसदेत झालेल्या चर्चेतील विधानं तोडून मोडून जनतेसमोर मांडली आहेत. भाजपा नेत्यांनी विषय फॅक्ट्ससह मांडला, त्यामुळे काँग्रेस अंबेडकर विरोधी, आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी पक्ष असल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला आणि आणीबाणी लागू करून संविधानाचा अपनान केला, न्यायालयाचा अपमान केल्याचा घणाघात त्यांनी केला.
बाप होण्यासाठी जिवंत गिळलं कोंबडीचं पिल्लू; अघोरी कृत्य बेतलं जीवावर
अमित शाह म्हणाले, ” काँग्रेसने डॉ. बाबासाहेब अंबेडकरांना निवडणुकीत कसं हरवलं, याची संसदेत चर्चा झाली. काँग्रेसने यासाठी विशेष प्रयत्न केले होते. जिथे भारतरत्न देण्याची गोष्ट येते, तिथे काँग्रेसचे नेते स्वतःला भारतरत्न देत होते, पण बाबासाहेबांना भारतरत्न तेव्हा मिळालं जेव्हा काँग्रेस सत्तते नव्हती. काँग्रेस नेहमीच अंबेडकरांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न करत राहिली.”
अमित शाह यांनी सांगितले, “मी त्या पक्षातून येतो जो अंबेडकरांचा कधीच अपमान करू शकत नाही. राज्यसभेत मी जे काही मतं मांडलं, ते काँग्रेसने तोडून मोडून जनतेसमोर मांडलं. काँग्रेसने सत्य चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेहमीच आरक्षणाचा विरोध करत आली आहे. ३१ डिसेंबर १९८० रोजी मंडल आयोगाचा अहवाल आला, पण काँग्रेसने तो लागून केला नाही. १९९० मध्ये जेव्हा गैर काँग्रेस सरकार आले तेव्हा मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला. त्यावेळी राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात मोठं भाषण दिलं होतं.”
One Nation One Election : भारतात पहिल्यांदा एक देश एक निवडणूक कधी झाली? का बंद झाली? वाचा सविस्तर
अमित शाह म्हणाले, “ज्यांनी जीवनभर अंबेडकरांचा विरोध केला, तेच आज संभ्रम निर्माण करत आहेत. माझं संपूर्ण भाषण राज्यसभेच्या रेकॉर्डमध्ये आहे. काँग्रेसकडे जेव्हा काही उत्तर उरले नाही, तेव्हा त्यांनी माझ्या भाषणातील काही मुद्दे पसरवून संभ्रम निर्माण केला. मी त्या पक्षात येतो जो अंबेडकरांच्या विचारांचा अपमान कधीच करणार नाही. आम्हाला याची जाणीव आहे की, देशाच्या संविधानाला बनवण्यात, दलितांना, वंचितांना न्याय मिळवून देण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे. आम्ही असे काही करू शकत नाही ज्यामुळे बाबासाहेबांचा अपमान होईल. काँग्रेसच्या खोट्या प्रचारांचा मी निषेध करतो. मी अंबेडकरांचा अनुयायी आहे, असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान अमित शहा यांच्या राज्यसभेतील भाषणाचे देशभर पडसाद उमटले. कॉंग्रेसने अमित शहांविरोधात ठिक ठिकाणी निर्दशने केली. काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं.