चाळीसगाव : तालुक्यात सरकारी कामाच्या बांधकामासाठी लागत आहे; असे निर्लज्जपणाने खोटे सांगत, माहिती लपवत, कोणतीही कशाचीही परवानगी न घेताच जुने-नवे ठेकेदार अवैधरित्या मुरूम असो वा गौण खनिज असो हे सर्रासपणे चोरून उत्खनन करून वापरत असल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत असल्यानं ‘धाक ना धनी अन् म्हाले कोण म्हनी’ हे आता असं झाल्याचं सद्यस्थितीत दिसून येत आहे. याला प्रशासनाचे अन् प्रस्थापित लोकप्रतिनिधीचे प्रचंड दुर्लक्ष देखील कारणीभूत आहे.
चाळीसगाव तालुक्यात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी धडक नदीची पाहणी करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. जेणेकरून याला आळा बसेल. तालुक्यातील मौजे तिरपोळे येथे अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.
धुळे ते चाळीसगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर असून ह्या चौपदरीकरण रस्त्याचे काम कलथिया कन्स्ट्रक्शन कंपनी करत असताना (एमएच-२० जीसी ०३४१) या क्रमांकाचे डंपर भरदिवसा दुपारी ३.४७ वाजता महसूल पथकाने जप्त केले आहे. चाळीसगाव महसूल पथक आणि मेहुनबारे ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही धडक कारवाई केली.