
नागपूर हादरले! पतीच्या मदतीने पत्नीने प्रियकराला संपवले (Photo Credit - X)
#Maharashtra #Nagpur– A shocking incident has been reported from #Khaparkheda area of Nagpur, where a youth from Pune was allegedly attacked in broad daylight. The youth had reportedly come to his native village to celebrate #Holi when the assault took place.
1/3 https://t.co/i87T8Zx38X pic.twitter.com/UCanYF5Mwf — Siraj Noorani (@sirajnoorani) March 6, 2026
सागर रामचंद्र वानखेडे (रा. येरला) असे मृताचे नाव आहे. पोलीस तपासात समोर आले की, सागर आणि आरोपी सोनाली हे दूरचे नातेवाईक असून त्यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, सोनालीचे लग्न राजू ऊर्फ राजेश गजभिये याच्याशी झाले आणि त्यांना दोन मुलेही झाली. लग्नानंतर सागर पुण्याला राहायला गेला, तरीही तो नागपूरला आला की सोनालीवर भेटीसाठी दबाव टाकायचा. सोनालीच्या अनैतिक संबंधांची माहिती पती राजूला होती, मात्र मुलांच्या भविष्यासाठी तो तिला केवळ समजावत होता.
होळीनिमित्त सागर नागपूरला आला असता त्याने सोनालीला पुन्हा भेटण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. सोनालीने पर्समध्ये सत्तूर लपवून सागरला श्याम मंगल कार्यालयाजवळ भेटायला बोलावले. सागर तिला दुचाकीवर बसवून कोराडी मार्गाकडे निघाला, याची माहिती सोनालीने फोनवरून पतीला दिली. कोराडी मंदिर मार्गावर एका निर्जन स्थळी सोनालीने योजनेनुसार आपली पर्स रस्त्यावर पाडली आणि सागरला गाडी थांबवण्यास सांगितले.
सागर गाडी थांबवून पर्स उचलण्यासाठी खाली उतरला असता, पाठलाग करत असलेला राजू तेथे पोहोचला. दोघांना रंगेहाथ पकडल्याचा बनाव करून राजूने वाद सुरू केला. यावेळी सोनालीने पर्समधील सत्तूर काढून पतीच्या हातात दिला. सोनालीने सागरला घट्ट पकडून ठेवले आणि राजूने त्याच्या गळा, डोके व पोटावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती-पत्नीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. “सागर मला वारंवार सोबत नेण्याच्या बहाण्याने माझे शोषण करत होता, त्यामुळेच हे पाऊल उचलले,” अशी कबुली सोनालीने पोलिसांना दिली आहे.