Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यातून शेतकऱ्यांना मिळणार २० वर्षांपासून रखडलेला भूसंपादनाचा मोबदला

आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी प्रयत्न केले. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून २० वर्षांपूर्वी कुकडीच्या डाव्या कालव्यात जमीन संपादित झालेल्या कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक, कोरेगाव व करपडी येथील शेतकऱ्यांना ४ कोटी ३२ लाख रुपये एवढी रक्कम सरकारने मंजूर केली आहे. राज्य सरकारतर्फे थेट शेतकऱ्यांना तब्बल २० वर्षानंतर भूसंपादनाचा मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2022 | 03:47 PM
आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यातून शेतकऱ्यांना मिळणार २० वर्षांपासून रखडलेला भूसंपादनाचा मोबदला
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायमच प्रयत्न करत असतात. तसेच मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असतात. अशातच कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी २० वर्षांपूर्वी कुकडी डाव्या कालव्यात संपादित झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.

अखेर आमदार रोहित पवार यांनी या विषयात स्वतः विशेष लक्ष घातलं आणि शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी प्रयत्न केले. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून २० वर्षांपूर्वी कुकडीच्या डाव्या कालव्यात जमीन संपादित झालेल्या कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक, कोरेगाव व करपडी येथील शेतकऱ्यांना ४ कोटी ३२ लाख रुपये एवढी रक्कम सरकारने मंजूर केली आहे. राज्य सरकारतर्फे थेट शेतकऱ्यांना तब्बल २० वर्षानंतर भूसंपादनाचा मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या २० ते २५ वर्षात जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना केवळ ५-६ कोटी रुपये रक्कम मंजूर झाली होती. पण रोहित दादा आमदार झाल्यानंतर त्यांनी शासनाकडून तब्बल १४० कोटीच्या आसपास रक्कम मंजूर करून आणली. यातून शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागतोच शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा तालुक्यात आल्यानंतर तालुक्यातील आर्थिक उन्नती होण्यासाठी पण त्याचा फायदा होतो.

[read_also content=”आ. रोहित पवारांच्या माध्यमातून होणार नांदणी नदीचे पुनरुज्जीवन; १७ गावांना होणार फायदा! https://www.navarashtra.com/maharashtra/come-on-nandani-river-to-be-revived-through-rohit-pawar-17-villages-will-benefit-nrdm-276453.html”]

यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता की त्यांना त्यांचा हक्काचा मोबदला शासनाकडून मिळवून देण्यात येईल, रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावला आहे आणि आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भूसंपादनाची रक्कम मिळणार आहे. येत्या काळातही मतदारसंघातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या सोयीसाठी सतत झटत राहील व दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी व प्रलंबित असलेले नानाविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Following in the footsteps of mla rohit pawar farmers will get compensation for land acquisition which has been stalled for 20 years nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2022 | 03:47 PM

Topics:  

  • ahmednagar
  • cmomaharashtra
  • jayant patil
  • Karjat Jamkhed
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?
2

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा
3

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन
4

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.