Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळेंच्या भूमिकेकडे लक्ष

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 01, 2021 | 08:41 PM
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी;  हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळेंच्या भूमिकेकडे लक्ष
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : संपूर्ण राज्यामध्ये नेहमीच लक्षवेधी ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या या बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्ष लक्ष घालणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली असून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा बँकेवर सुरुवातीपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. या बँकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, तसेच काँग्रेसचे नेते व विद्यमान आमदार संजय जगताप यांना बरोबर घेऊन आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र याला अपवाद इंदापूर आहे.मागील निवडणुकीमध्ये आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादीमधून बिनविरोध निवडून आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून जगदाळे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपशी घरोबा करत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मांडलिकत्व स्वीकारले आहे. आता या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे राष्ट्रवादीबरोबर येतात की, माजी सहकारमंत्री ‌ हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर राहून राष्ट्रवादीला आव्हान देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

कराड (जि.सातारा) तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांमध्ये शिरकाव केला आहे. या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल कुल व हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून लक्ष घालण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. सहकार खाते अमित शहा यांच्याकडे असल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी सह राज्यातील अन्य जिल्हा बँकेच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या माध्यमातून सहकारी बँकच्या निवडणुकीत लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता काबीज करणे सध्यातरी भाजपला शक्यच नसल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीपासून या जिल्हा बँकेवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही मोठी सर्वात जमेची बाजू आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये काँग्रेसबरोबरच शिवसेनेच्या काही नेत्यांना आघाडीच्या धर्मानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार बरोबर घेणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर तालुक्यातून गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार मोर्चे बांधणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी केली आहे.

इंदापूरचे विद्यमान आमदार व बँकेचे विद्यमान संचालक, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भूमीकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. जगदाळे यांना राष्ट्रवादीत पुन्हा परतण्यासाठी ना.भरणे प्रयत्न करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरीत सप्टेंबर नंतर पुणे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे, दरम्यानच्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकंदरीत चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Formation of aspirants for pune district bank elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2021 | 05:37 PM

Topics:  

  • Amit Shah
  • अमित शहा

संबंधित बातम्या

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
1

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
2

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध
3

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक
4

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.