Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : पदार्थाला द्या हटके टच, यंदा ओरिओ बिस्किटांपासून बनवा चविष्ट मोदक

Orio Modak Recipe : यंदाची गणेश चतुर्थी गोड नाही तर चॉकलेटी करा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा स्वादिष्ट मोदक. हे मोदक फार झटपट तयार होतात आणि चवीबरोबरच दिसायलाही आकर्षक दिसतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2025 | 01:51 PM
Ganesh Chaturthi 2025 : पदार्थाला द्या हटके टच, यंदा ओरिओ बिस्किटांपासून बनवा चविष्ट मोदक

Ganesh Chaturthi 2025 : पदार्थाला द्या हटके टच, यंदा ओरिओ बिस्किटांपासून बनवा चविष्ट मोदक

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सण. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक घरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. गणरायांना मोदक हा अत्यंत प्रिय नैवेद्य मानला जातो. पारंपरिक उकडीचे मोदक तर प्रत्येक घरात होतातच, पण आजच्या पिढीला थोडंसं हटके आणि झटपट बनणारे मोदक आवडतात. विशेषत: लहान मुलांना ओरिओ बिस्किट खूप आवडतात, त्यामुळे ओरिओ बिस्किट मोदक हा एक उत्तम पर्याय ठरतो. या मोदकात पारंपरिक चव आणि आधुनिक ट्विस्ट एकत्र येतात.

जेवणासाठीचा मसालेदार मेन्यू! घरी बनवून तर पहा पंजाबी स्टाईल चमचमीत छोले भटुरे

ओरिओ बिस्किट मोदकाची खासियत म्हणजे हे मोदक बनवायला अगदी कमी वेळ लागतो, गॅसवर उकड काढण्याची किंवा जास्त परिश्रम करण्याची गरज नसते. शिवाय हे मोदक स्वादिष्ट, कुरकुरीत आणि आकर्षक दिसतात. गणरायांना नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे आणि घरातील सगळ्यांनाच आवडणारी आहे. चला तर मग जाणून घेऊया ओरिओ मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • ओरिओ बिस्किट – २५ ते ३०
  • दूध – ½ कप (गरजेनुसार)
  • तूप – २ टेबलस्पून
  • साखर पावडर – २ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • सुके मेवे (काजू, बदाम, पिस्ते – बारीक चिरलेले) – २ टेबलस्पून
  • किसलेला नारळ – २ टेबलस्पून (ऐच्छिक, चव वाढवण्यासाठी)
  • मोदकाचा साचा
कृती :
  • यासाठी सर्वप्रथम ओरिओ बिस्किटाचे क्रीम वेगळे करून घ्या.
  • बिस्किट मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर करून घ्या.
  • एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बिस्किटाची पावडर टाका आणि मंद गॅसवर छान परता.
  • आता त्यात दूध थोडं-थोडं घालून मऊसर मिश्रण तयार करा.
  • साखर पावडर, बारीक चिरलेले सुके मेवे आणि नारळ घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
  • आता मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यात हे मिश्रण भरून मोदकाचे आकार द्या.
  • सर्व मोदक तयार करून छान प्लेटमध्ये सजवा.
  • मोदक अधिक स्वादिष्ट करण्यासाठी बिस्किटातील क्रीम मिश्रणात घालू शकता.
  • जर मोदक घट्ट होत नसतील तर थोडंसं दूध किंवा तूप वाढवू शकता.
  • मुलांना आवडण्यासाठी वरून चॉकलेट सिरप किंवा ड्रायफ्रूट्सने सजावट करा.
  • हे चविष्ट ओरिओ बिस्किट मोदक गणरायांना नक्कीच प्रिय पडतील आणि घरातील सगळ्यांना आवडतील.
रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

FAQs (संबंधित प्रश्न)

ओरिओ मोदक किती दिवस साठवून ठेवले जाऊ शकतात?
ओरिओ मोदक तुम्ही आठवडाभर फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता.

ओरिओ मोदक देवाला अर्पण केले जाऊ शकतात का?
पारंपरिक नसले तरी हे हटके मोदक देवाला अर्पण केले जाऊ शकतात.

Web Title: Ganesh chaturthi 2025 make tasty and chocolatey oreo modak recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • marathi recipe
  • modak news

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?
2

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
4

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.