रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय
भारतीय जेवणाच्या ताटात कायमच असणारे पदार्थ म्हणजे डाळ भात. या पदार्थांशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतच नाही. जेवणात कितीही चांगले, चमचमीत पदार्थ बनवले तरीसुद्धा डाळ भात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. पण जेवणात कायमच साधी डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ढाबास्टाईल दाल फ्राय बनवू शकता. बऱ्याचदा घरी बनवलेल्या डाळीला ढाबा स्टाईल चव येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढेल आणि जेवणात चार घास जास्त जातील. ढाबा स्टाईल डाळ फ्राय तुम्ही गरमागरम जिरा राईस किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ढाबा स्टाईल डाळ फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी






