मुंबई:कोरोनाच्या(Corona) डेल्टा प्लस(Delta Plus) प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काळजी घेत आहे. सध्या वापरत असलेली लस या व्हेरिएंटवर(New Variant OF Corona) प्रभावी आहे. बर्याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स, कोरोना व्हायरस अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतोच, असे म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस(Vaccine) घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी केले आहे.
[read_also content=”सचिन वाझे प्रकरणी भाजप आक्रमक, अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची करणार मागणी https://www.navarashtra.com/latest-news/bjp-in-attacking-mode-in-sachin-waze-case-demanded-cbi-inquiry-of-ajit-pawar-nrsr-146668.html”]
संक्रमणाचा दर जास्त असण्याची शक्यता
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराच्या विषाणूने चिंता वाढवली आहे. राज्यातील ७ जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील २१ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, असे असले तरी त्याचा संक्रमणाचा दर जास्त असू शकतो.
डेल्टा प्लसमुळे एकही मृत्यू नाही
डेल्टा प्लस प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोणत्या प्रकारची काळजी घेत आहे, १५ मे पासून राज्य सरकारने याबाबत कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत ३४०० नमुन्यांपैकी २१ मध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचे टोपे यांनी सांगितले.
आढळलेल्या २१ रुग्णांचे विलगीकरण करून त्यांचे निरीक्षण केले जात असून, त्यांच्याबाबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सुरु असल्याचेही टोपे यांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे सुदैवाने डेल्टा प्लसमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. केंद्र सरकारला ही माहिती पाठवण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे
विषाणूकडून रुप बदलले जाते
ते म्हणाले की, नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचे रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधे घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलले जाते. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.