बंगळुरू : कर्नाटकमधील हिजाब प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शाळेत मुलींनी शाळेच्या गणवेशातच यावे, धार्मिक वस्त्र परिधान करू नये, असा आदेश देत हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मुलींना हिजाब काढायला लावून शाळेत प्रवेश दिला जातोय. अनेक ठिकाणी लोक न्यायालयाच्या या आदेशाचा विरोध करताना दिसून येत आहेत. दरम्यान, हिजाब काढायला लावल्यामुळे आज एका महिला शिक्षिकेने राजीनामा दिल्याचे समोर आले आहे(Hijab controversy will simmer further; Karnataka professor resigns after hijab removal).
महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगितल्यानंतर कर्नाटकातील एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिकेने स्वाभिमान दुखावल्याचे सांगत राजीनामा दिला. तुमाकुरू येथील जैन पीयू कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या चांदिनीने सांगितले की, ती जवळपास तीन वर्षापासून या कॉलेजमध्ये काम करत होती. परंतु तिला पहिल्यांदाच तिचा हिजाब काढण्यास सांगण्यात आले.
मी गेल्या तीन वर्षांपासून जैन पीयू कॉलेजमध्ये काम करत आहे. मला आतापर्यंत कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही. पण गुरुवारी मला मुख्याध्यापकांनी सांगितले की, मी शिकवताना हिजाब किंवा कोणतेही धार्मिक चिन्ह घालू शकत नाही. पण मी गेल्या तीन वर्षांपासून हिजाब परिधान करून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. हा नवा निर्णय माझ्या स्वाभिमानाला धक्का देणारा आहे. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे चांदिनी यांनी पत्रकारांना सांगितले.
कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरील निर्बंध आणि त्यांच्या विरोधात निदर्शने यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी सहा विद्यार्थीनींना हेडस्कार्फ घालून वर्गात जाण्यापासून रोखल्याचा आरोप केल्यावर निदर्शने सुरू झाली. त्यानंतर हा विरोध वाढला आणि अनेक महाविद्यालयांमध्ये पसरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत धार्मिक ओळख पटवणारी चिन्हे किंवा कपडे घालून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
कर्नाटक हिजाबचा वाद शुक्रवारीही सुटू शकला नाही. हिजाब ही इस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही, असा युक्तिवाद या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कर्नाटक सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल (एजी) प्रभुलिंग नवदगी यांनी खंडपीठासमोर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरीकडे, हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना शुक्रवारीही कर्नाटकातील शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]