Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND-A vs  SA-A: भारतापुढे दक्षिण आफ्रिकाची शरणागती! कर्णधार ऋषभ पंतची विजयी फटकेबाजी

पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन विकेट्सने धूळ चारली आहे.  या सामन्यात ऋषभ पंतने महत्वपूर्ण 90 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 02, 2025 | 05:47 PM
IND-A vs SA-A: South Africa surrenders to India! Captain Rishabh Pant's winning knock

IND-A vs SA-A: South Africa surrenders to India! Captain Rishabh Pant's winning knock

Follow Us
Close
Follow Us:

IND-A vs  SA-A : पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन विकेट्सने धूळ चारली आहे.  या सामन्यात रोमांचक वळण आली. परंतु अखेर ऋषभ पंत, आयुष बदोनी आणि अंशुल कंबोज यांच्या शानदार खेळीच्या जोरावर  भारताने २७५ धावांचे लक्ष्य सहज गाठले. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या दुसऱ्या डावात भारतासमोर २७५ धावांचे आव्हान दिले होते. ज्याचा भारतीय फलंदाजांनी संघर्षानंतर यशस्वीपणे पाठलाग करत दक्षिण आफ्रिका अ संघावर ३ विकेट्सने विजय मिळवला.

 

ऋषभ पंतची विजयी खेळी

भारत अ संघासाठी, कर्णधार ऋषभ पंतने दुखापतीतून सावरत मैदानात पुनरागमन केले.  त्याच्या क्लासिक फलंदाजीचे एक उत्तम उदाहरण त्यान दाखवून दिले. त्याने दुसऱ्या डावात ११३ चेंडूत ९० धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. तो शतकापासून केवळ १० धावा दूर राहीला असला तरी, त्याच्या खेळीने संघाच्या विजयाचा पाया रचण्यात मोठी कामगिरी केली. आयुष बदोनीनेही ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सामना महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, अंशुल कंबोजने खालच्या क्रमवारीत ३७ धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तनुष कोटियनने २३ धावा जोडून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा : IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी

भारतीय फलंदाजांची बुद्धिमत्ता आणि पंतच्या कर्णधारपदाने हे कठीण लक्ष्य साध्य करण्यात मोठे योगदान दिले.  पंतची आक्रमक रणनीती आणि संयमी फलंदाजीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

दक्षिण आफ्रिका अ संघाचा दुसरा डाव कमकुवत होता.

दक्षिण आफ्रिका अ संघाचे फलंदाज दुसऱ्या डावात पूर्णपणे अपयशी ठरले, त्यांना फक्त १९९ धावांवरच रोखण्यात आले. आफ्रिकन संघासाठी, फक्त झुबैर हमजा आणि लेसो सेनोकवानेच प्रत्येकी ३७ धावा केल्या. उर्वरित फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत.   भारताकडून तनुष कोटियनने शानदार गोलंदाजी करत चार बळी घेतले, तर अंशुल कंबोजने तीन फलंदाजांना माघारी पाठवले.

पहिल्या डावात देखील कोटीयनची कामगिरी  प्रभावी राहिली होती. पहिल्या डावात चार विकेट घेतल्या आणि आफ्रिकन संघाची आघाडी मर्यादित राखण्यात यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३०९ धावा केल्या, ज्यामध्ये जॉर्डन हरमनने ७१, झुबेर हमजा यांनी ६६ आणि रुबिन हरमन यांनी ५४ धावा फटकावल्या. भारताकडून मानव सुथार आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.

हेही वाचा : PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम

भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २३४ धावाच उभारू शकला. ज्यामध्ये आयुष म्हात्रेने ६५ धावा केल्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडे ७५ धावांची आघाडी होती. तथापि, दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांना चांगलेच आढकणीत आणले. यामुळे भारत अ संघाने सहज लक्ष्य गाठले आणि तीन विकेटने विजय मिळवला.

Web Title: Ind a vs sa a south africa surrender to india with captain rishabh pants winning knock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी
1

IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी

IND A vs SA A Test : दुखापतीनंतर परतलेला ऋषभ पंतची बॅट चालली, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला हरवण्याच्या मार्गावर!
2

IND A vs SA A Test : दुखापतीनंतर परतलेला ऋषभ पंतची बॅट चालली, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला हरवण्याच्या मार्गावर!

टीम इंडिया अ संघात पुनरागमन केल्यानंतर, रिषभ पंतने दिला ग्रीन सिग्नल! म्हणाला – “मी आनंदाने सांगू शकतो की आता मी…”
3

टीम इंडिया अ संघात पुनरागमन केल्यानंतर, रिषभ पंतने दिला ग्रीन सिग्नल! म्हणाला – “मी आनंदाने सांगू शकतो की आता मी…”

इंग्रजांचा क्रिकेटचा नियम BCCI ने मोडला! पहिल्यांदाच, कसोटी सामन्यांमध्ये दुपारच्या जेवणापूर्वी होणार चहापानाचा ब्रेक
4

इंग्रजांचा क्रिकेटचा नियम BCCI ने मोडला! पहिल्यांदाच, कसोटी सामन्यांमध्ये दुपारच्या जेवणापूर्वी होणार चहापानाचा ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.