डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांचं जीवन आणि आपल्या देशातील बौद्ध वारसाशी निगडित स्थळांना जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला आयआरसीटीसीचे काही विशेष टूर पॅकेज एकदा बघायला हवेत. कारण,इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने ‘देखो अपना देश’ याअंतर्गत बाबासाहेब आंबेडकर यात्रा (Babasaheb Ambedkar) टूर पॅकेजची घोषणा केली आहे. ज्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख ठिकाणे दाखवण्यात येणार आहेत. बाबा साहेब आंबेडकर यात्रेचा पहिला प्रवास 14 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथून सुरू होणार आहे.
7 रात्री आणि 8 दिवसांचे हे टूर पॅकेज दिल्लीहून भारत गौरव पर्यटक ट्रेनने सुरू होईल आणि त्याचा पहिला थांबा मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर (महू) आहे, जी बाबासाहेबांची जन्मभूमी (भीम जन्मभूमी) आहे. त्यानंतर ही ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकापर्यंत जाईल जिथे पर्यटक नवयन बौद्ध धर्माचे पवित्र वास्तू दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ही ट्रेन नागपूरहून सांचीला रवाना होईल. ज्यामध्ये सांचीच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये सांचीचा स्तूप आणि इतर बौद्ध स्थळांचा समावेश आहे
This year, join us on the Baba Saheb Ambedkar Yatra aboard Bharat Gaurav Tourist Train. We take you through places that were important to his life and teachings. Get ready for a truly inspiring experience! #BabasahebAmbedkaryatra #BharatGauravTouristTrain https://t.co/HDDhNlJe5v pic.twitter.com/tw4vMDuv0e — IRCTC (@IRCTCofficial) February 24, 2023
सांची नंतर, वाराणसी ही ट्रेन पुढे सारनाथ आणि काशी विश्वनाथ मंदिरा देखील भेट देणार आहे. पुढचे आणि अंतिम पर्यटन स्थळ म्हणजे गया. तेथे पर्यटकांना प्रसिद्ध महाबोधी मंदिर आणि इतर मठांना भेट देण्यासाठी बोधगयाच्या पवित्र स्थळी नेले जाईल. राजगीर आणि नालंदा येथील इतर महत्त्वाची बौद्ध स्थळेही रस्त्याने पाहण्यात येतील केली जातील. हा प्रवास अखेर नवी दिल्लीत संपणार आहे. पर्यटकांना दिल्ली, मथुरा आणि आग्रा कॅंट स्थानकांवर ट्रेनमध्ये चढण्याचा/ उतरण्याचा पर्याय असेल. IRCTC ने आखलेल्या या बाबासाहेब आंबेडकर यात्रेचा उद्देश आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत ठिकाणे आणि खुणा अधोरेखित करणे हा आहे. या टूर पॅकेजशी संबंधित इतर माहिती IRCTC वेबसाइट irctctourism.com वर उपलब्ध आहे.