Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

पॅलेस ऑन व्हील्स हा प्रवास म्हणजे फक्त गंतव्यस्थान गाठण्याचा अनुभव नाही, तर तो एक ऐश्वर्यपूर्ण सफर आहे, जिथे प्रत्येक क्षण राजेशाही भासतो. ज्यांना इतिहास, संस्कृती आणि लक्झरी यांचा संगम अनुभवायचा आहे, त्यांच्यासाठी ही ट्

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2025 | 08:16 AM
भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Follow Us
Close
Follow Us:

भारताची रेल्वे फक्त प्रवासाचे साधन नाही, तर पर्यटन आणि ऐश्वर्याचा अनुभव देणारे माध्यमही आहे. साध्या गाड्यांमध्ये आपण आपल्या खिशानुसार तिकिट घेतो आणि प्रवास पूर्ण करतो, पण काही ट्रेन अशा आहेत ज्या प्रवाशांना राजेशाही अनुभव देतात. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि महागडी ट्रेन म्हणजे पॅलेस ऑन व्हील्स. ही ट्रेन खरोखरच एका राजवाड्यासारखी आहे, म्हणूनच तिचं नाव “पॅलेस ऑन व्हील्स” ठेवण्यात आलं आहे.

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

प्रवासाचा खर्च

या ट्रेनमध्ये बसणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही, कारण तिचे तिकीट लाखोंमध्ये जाते. यातील भाडं सिझननुसार बदलतं. लो सीझन (एप्रिल व सप्टेंबर) मध्ये डबल ऑक्युपन्सी प्रति व्यक्ती भाडं सुमारे 5.36 लाख रुपयांपासून सुरू होतं. तर पीक सीझन (ऑक्टोबर ते मार्च) मध्ये हे भाडं 8 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतं. प्रेसिडेन्शियल सूट, सुपर डिलक्स, सिंगल आणि डबल ऑक्युपन्सी अशा विविध श्रेणींमध्ये प्रवासाची सोय उपलब्ध आहे.

प्रवासाचा रूट

ही आलिशान गाडी दिल्लीतील सफदरजंग स्थानकावरून सुरू होते आणि राजस्थानच्या विविध शहरांमध्ये फिरवते. जयपूर, सवाई माधोपुर, चित्तौडगड, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, भरतपूर अशी शहरे पाहायला मिळतात. शेवटी प्रवास आग्रा (ताजमहल) येथे संपतो आणि पुन्हा दिल्लीला परततो. हा प्रवास 7 रात्री व 8 दिवसांचा असतो आणि यात इतिहास, निसर्ग व सांस्कृतिक वारसा यांचा संगम अनुभवता येतो.

ट्रेनमधील सुविधा

पॅलेस ऑन व्हील्सला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा मान मिळालेला आहे. Conde Nast या पर्यटन मासिकाने तिला जगातील दुसरी सर्वोत्तम आलिशान ट्रेन ठरवलं आहे. या ट्रेनमध्ये –

  • दोन रेस्टॉरंट्स, जिथे भारतीय व आंतरराष्ट्रीय चविष्ट पदार्थ मिळतात.
  • एक बार, आरामासाठी खास सुविधा.

24 तास उपलब्ध असलेली सर्व्हिस

  • पूर्णपणे एसी केबिन्स, ट्रिपल, डबल आणि सिंगल बेडची सोय.
  • 2 सुपर डिलक्स आणि 39 डिलक्स केबिन्स.
  • एटीएम, सॅटेलाइट फोनसारख्या आधुनिक सोयी.

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

बुकिंग कसं करायचं?

या ट्रेनची बुकिंग सामान्य गाड्यांसारखी नाही. तुम्हाला 65 दिवस आधी बुकिंग करावी लागते. त्यावेळी एकूण भाड्यापैकी 25% रक्कम जमा करून बुकिंग करता येतं, मात्र उरलेली 75% रक्कमही प्रवासाच्या 65 दिवस आधी भरणं आवश्यक असतं.

Web Title: Indias most expensive train fare cost15 lakh rupees travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • Indian Railway
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
1

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
2

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर
3

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.