जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि स्लिम
जपान हा देश जगभर आपल्या तंत्रज्ञानासाठी आणि आपल्या लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तेथील लोक दीर्घकाळ फिट राहतात आणि दीर्घायुषी जगतात. फास्ट फूडच्या वाढत्या प्रमाणामुळे जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण फार अधिक आहे. मात्र जपानमध्ये लठ्ठपणाचा रेट हा फक्त 3.5 टक्के आहे. जपानचे लोक स्लिम आणि निरोगी राहण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर करतात. त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुषी जीवनशैलीमुळे, अनेकजण या देशातील लोकांच्या आहाराच्या सवयीनबद्दल जाणून घेण्यासाठी फार इच्छुक आहेत. आज आम्ही तुम्हाला जपानी लोकांचे फिट राहण्यामागेचे रहस्य उलगडून सांगणार आहोत.
हेदेखील वाचा – 20 रुपयांच्या किमतीत मिळणाऱ्या या भाज्या खेचून काढतात रक्तातील घाण, आजच आहारात करा समावेश
आपल्याकडे जेवण आपल्या आवडीचे असले की आपण चारघास जास्तीचे खातो मात्र जपानमध्ये असे होत नाही. तिथे लोक आपल्या भुकेच्या 80% टक्के जेवण कमी करतात. हे त्यांच्या कॅलरी कंट्रोल आणि माइंडफुल इटिंग कल्चरच्या मदतीने शक्य होते. त्यांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा अधिक समावेश असतो, ज्यामुळे त्यांना वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
भारतात लोक जेवण जेवताना आपल्या हातांचा किंवा चमच्याचा वापर करतात. ज्यामुळे फार मोठे घास घेतले जाते आणि भुकेपेक्षा जास्तीचे खाल्ले जाते. याविरुद्ध, जपानी लोक जेवण्यासाठी चॉपस्टिक्सचा वापर करतात. चॉपस्टिकमुळे खाण्याची गती किंवा वेग कमी होतो. ज्यामुळे आपण कमी जेवतो आणि आपल्या पोटात गरजेपेक्षा कमी अन्न जाते. या सवयीमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हेदेखील वाचा – केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश
जपानमध्ये रेड मीटपेक्षा सी फूड खाण्यावर अधिक भर दिला जातो. रेड मीटच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल, सूज आणि लठ्ठपणा वाढतो, तर सी फूडमुळे ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि प्रथिने मिळतात, जे वजन कमी करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात.
भारतीय लोकांमध्ये दुग्धजन्य पदार्थ जसे की, पनीर, दही, ताक यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. परंतु, जपानमध्ये याउलट अशा पदार्थांचे फार कमी सेवन केले जाते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जपानी लोक त्यांच्या आहारातून हे पदार्थ काढून टाकतात. अधिकतर देशात जेवणानंतर आईस्क्रीमचे सेवन केले जाते मात्र जपानमध्ये जेवणानंतर फळांचा आनंद लुटला जातो.