• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Jayant Naralikar Book Virus On Storytell Marathi Audio Book Nrst

डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘व्हायरस’ ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’मध्ये!

'व्हायरस' 'स्टोरीटेल मराठी'च्या 'ऑडिओबुक' मध्ये ऐकत असताना अप्रत्यक्ष रित्या डोळ्यांसमोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jun 24, 2021 | 05:42 PM
डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘व्हायरस’ ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’मध्ये!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रतिभावंत साहित्यिक, प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक आणि समतोल समाजचिंतक पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृध्द केले आहे. २०१५ सालच्या ‘साहित्य अकादमी पुरस्काराने’ सन्मानित ‘व्हायरस’ हि सायन्स फिक्शन कादंबरी आता ‘स्टोरीटेल मराठीच्या’ लोकप्रिय ‘ऑडिओबुक’ मध्ये उपलब्ध झाली आहे. आवाजाच्या दुनियेतील जादूगार व्हॉइसिंग आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या खणखणीत आवाजात साहित्यप्रेमी आणि विज्ञानप्रेमी श्रोत्यांचं कुतूहल चाळवणारी हि कादंबरी ‘स्टोरीटेल मराठीच्या’ ‘ऑडिओबुक’ मध्ये ऐकणं आता पर्वणी ठरणार आहे.

‘व्हायरस’ ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’ मध्ये ऐकत असताना अप्रत्यक्ष रित्या डोळ्यांसमोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते. या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथेत मानवी जीवनासमोर अस्तित्त्वात आलेले संकट उद्भवणार्‍या प्राणघातक विषाणूचा धोका दर्शविला गेला आहे. आलेल्या संकटावर वैज्ञानिक मिळून कशी मात करतात? हे जाणून घ्यायचं असेल तर , नक्की ऐका प्रसिद्ध व्हॉईसओव्हर आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात ,”व्हायरस”

‘व्हायरस’ (इ.स. 1996) ही नारळीकरांची चौथी कादंबरी. वसाहतवादी प्रेरणांनी संगणकप्रणालीत विषाणू सोडून परग्रहावरील सजीवांनी केलेले छुपे आक्रमण, पृथ्वीवासियांनी त्याचा लावलेला छडा आणि केलेला प्रतिबंध हे ‘व्हायरस’चे मुख्य आशयसुत्र आहे. निरनिराळया राष्ट्रांतील जीवन विस्कळीत होऊ लागते, यामागे राष्ट्रीय कारवाया आहेत, याचा छडा लावण्याचा प्रयत्न निनिराळया राष्ट्रांतील शास्त्रज्ञ, लष्करी तज्ज्ञ आणि प्रशासकीय यंत्रणा घेत असतात, हे ‘व्हायरस’चे उपसूत्र आहे. पृथ्वीपासून सहा प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यापर्यंतच्या असीम स्थलावकाशात साडेसहा वर्षांच्या काळात घडलेल्या घटनांची कथा म्हणजे ही कादंबरी होय. बुध्दिमान वैज्ञानिकांचे अंतर्गत व्यवहारविश्व आणि त्यांच्याभोवतीची प्रशासनयंत्रणा यांचे चित्रण हे ‘व्हायरस’चे दुसरे उपसूत्र आहे. अशा प्रकारे मध्यवर्ती आशयसूत्राला परिपुष्ट करणाऱ्या पूरक आणि पोषक उपसूत्रांनी ‘व्हायरस’ भरीव होते. ‘व्हायरस’ कादंबरी ‘स्टोरीटेल मराठीच्या’ लोकप्रिय ‘ऑडिओबुक’ मध्ये ऐकताना श्रोत्यांना हॉलिवूडच्या ‘इंडिपेन्डन्स डे’ चित्रपटाची आठवण करून देणारे गोष्ट आपण ऐकत असल्याचा भास होत राहतो.

‘व्हायरस’मधील थरार आणि रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.

Web Title: Jayant naralikar book virus on storytell marathi audio book nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2021 | 05:41 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Egg Curry Recipe : झणझणीत तर्रीदार अंडा करी अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा; चव चाखाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

Egg Curry Recipe : झणझणीत तर्रीदार अंडा करी अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा; चव चाखाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

Asia cup 2025 : ‘लाज वाटू दे देशद्रोही माणसा…’, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याकडून मोठी चूक? चाहत्यांचा उडाला भडका

Asia cup 2025 : ‘लाज वाटू दे देशद्रोही माणसा…’, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याकडून मोठी चूक? चाहत्यांचा उडाला भडका

iPhone 17 Series launch: लाईव्ह ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज

iPhone 17 Series launch: लाईव्ह ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज

Nepal Crises:’ जमाव माझ्या मागे लागला..’.; भारतीय महिलेने सांगितले नेपाळमधले भयावह वास्तव, पाहा Video

Nepal Crises:’ जमाव माझ्या मागे लागला..’.; भारतीय महिलेने सांगितले नेपाळमधले भयावह वास्तव, पाहा Video

नवरात्रीपर्यंत चेहरा दिसेल अतिशय चमकदार! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा ‘हे’ क्रीम, टॅनिंग- पिंपल्स होतील दूर

नवरात्रीपर्यंत चेहरा दिसेल अतिशय चमकदार! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा ‘हे’ क्रीम, टॅनिंग- पिंपल्स होतील दूर

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई

World War III : संपूर्ण जगात हुकूमशाहीचा उदय आणि जनतेचा रोष; नक्की सरकार जबाबदार की Gen Z चा दोष?

World War III : संपूर्ण जगात हुकूमशाहीचा उदय आणि जनतेचा रोष; नक्की सरकार जबाबदार की Gen Z चा दोष?

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.