(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय स्वयंपाकात अंड्याची करी हा अतिशय लोकप्रिय आणि सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने ते पौष्टिक तर आहेच, पण चवीलाही अप्रतिम लागते. अंड्याची करी बनवायला सोपी असून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. ही करी भात, पोळी, पराठा किंवा अगदी ब्रेडसोबतही अप्रतिम लागते. महाराष्ट्रातील घराघरांत ही करी अनेक प्रकारे बनवली जाते – कुठे साधी मसाल्याची करी, तर कुठे नारळाची चव देऊन खास कोकणी स्टाईलमध्ये.
अंड्याची करीची खासियत म्हणजे ती पटकन तयार होते आणि जास्त मेहनत लागत नाही. कामाच्या व्यस्त वेळेत झटपट करायची असेल तर ही डिश अगदी योग्य ठरते. मसाल्यांची खमंग चव आणि उकडलेल्या अंड्याचा मऊसर पोत यामुळे हिला नेहमीच खास स्थान मिळते. चला तर मग झणझणीत आणि चविष्ट अंडा करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
कृती
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊ-मोकळा शेवयांचा उपमा, अजिबात होणार नाही चिकट
अंडा करी साठवून ठेवता येते का?
होय, तुम्ही तयार अंडा करी फ्रिजमध्ये काही दिवस साठवून ठेवू शकता.
अंडा करीमध्ये नारळाचा वापर केला जाऊ शकतो का?
होय, गोवन स्टाईल अंडा करीमध्ये नारळाचा वापर केला जातो.