सेलू तालुक्यातील दहेगाव ते केळझर या सहा किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त नागरिकांनी अखेर रस्त्याच्या पक्क्या बांधकामाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पूर्णतः उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना रोजच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः गिट्टी भरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे रहदारी अधिकच धोकादायक झाली आहे.