iPhone 17 Series launch: लाइव ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज
Apple ने मंगळवारी iPhone 17 सीरीजह AirPods Pro 3 ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन लाँच केले आहेत. हे हेडसेट हार्ट रेट सेंसरने सुसज्ज आहेत. ईयरबड्स अधिक चांगल्या फीटसाठी नवीन डिझाईनसह लाँच करण्यात आले आहेत. तसेच या नवीन डिव्हाईसमध्ये नवीन चार्जिंग केस देखील देण्यात आला आहे. हे नवीन ईयरफोन आधीपेक्षा छोटे आणि स्लिम आहेत, मात्र यामध्ये लेनयार्ड सपोर्ट कायम ठेवण्यात आला आहे. सध्या हे हेडसेट केवळ अमेरिकेत प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. या महिन्याच्या शेवटी या हेडसेटची विक्री सुरु होणार आहे. खास गोष्ट म्हणजेच कंपनीने नवीन आयफोन 17 सिरीजसह Apple Watch Series 11, Watch Ultra 3 आणि Watch SE देखील लाँच केले आहे.
AirPods Pro 3 ची किंमत 249 डॉलर्स म्हणजेच सुमारे 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. हे ईयरबड्स सफेद रंगाच्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत आणि सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. भारतात AirPods Pro 3 ची किंमत 25,900 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, सर्व वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी, यूजर्सना नवीनतम सॉफ्टवेअर चालवणाऱ्या Apple डिव्हाइससह इयरफोन पेयर करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
Apple च्या AirPods Pro 3 ईयरफोनमध्ये हेल्थ सेंसर देण्यात आला आहे, जो हार्ट रेट ट्रॅकिंगसाठी मदत करणार आहे. याद्वारे, यूजर त्याच्या वर्कआउटची इंटेंसिटी आणि ओवरऑल हेल्थ मॉनिटर करू शकेल. AirPods Pro 3 मध्ये अडाप्टिव ANC आणि ट्रांसपेरेंसी मोड सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय या ईअरबड्समध्ये Apple Intelligence सह लाइव ट्रांसलेशन फीचर देखील देण्यात आला आहे, जे संभाषणादरम्यान रियल-टाइम लँग्वेज ट्रांसलेशन प्रदान करते.
AirPods Pro 3 मध्ये नवीन एर्गोनॉमिक डिझाईन देण्यात आले आहे. याची खासियत म्हणजेच हे ईअरबड्स लोकांच्या कानांच्या साईज आणि शेपनुसार कानांमध्ये एडजस्ट होतात. ज्यामुळे सिक्योर आणि आरामदायक अनुभव मिळतो. यामध्ये फोम-फिटेड ईयर टिप्सचे पाच वेगवेगळे आकार उपलब्ध आहेत.
प्रत्येक इअरबडला धूळ आणि पाण्याचा प्रतिकार करण्यासाठी IP57 रेटिंग देण्यात आली आहे. चार्जिंगची प्रगती, पेअरिंगची स्थिती आणि बॅटरीची पातळी सहज तपासण्यासाठी ते पुन्हा डिझाइन केलेल्या स्टेटस लाइट्ससह लहान आणि सडपातळ चार्जिंग केससह येते. कंपनीने असा दावा केला आहे की, प्रत्येक AirPods Pro 3 इयरबड एका चार्जवर 8 तासांपर्यंत प्लेबॅक देतो. ट्रांसपेरेंसी मोड आणि Hearing Aid सह, ते एका चार्जवर 10 तासांपर्यंत टिकू शकते.