विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्राचा सिक्कीमवर दणदणीत विजय, ओम भोसले आणि सिद्धेश वीरची शानदार खेळी
Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या संघाने सिक्कीमवर दणदणीत विजय मिळवत आपला विजयी रथ सुरूच ठेवला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या संघाने सिक्कीमवर 8 विकेट राखून शानदार विजय मिळवला. यामध्ये महाराष्ट्राकडून सलामीवीर ओम भोसले याने महत्त्वपूर्ण खेळी करीत 94 धावा केल्या तर सिद्धेश वीर याने 64 धावा केल्या.
सिक्कीमची खेळी
सिक्कीम संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 8 विकेट गमावून 234 धावा केल्या. सिक्कीमकडून पार्थ फलवाट आणि अन्वर मलिकने महत्त्वपूर्ण खेळी करीत धावांचे योगदान दिले. यामध्ये पार्थने 70 चेंडूत 64 धावा केल्या तर अंकुर मलिकने 40 चेंडूत 40 धावा केल्या. इतर फलंदाजांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. महाराष्ट्राच्या भेदक गोलंदाजांनी सिक्कीमला जखडून ठेवले.
महाराष्ट्राची गोलंदाजी
महाराष्ट्राकडून प्रदीप दधेने भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या. तर हिंगनेकरला अपेक्षित यश मिळाले नाही. तर राजवर्धन, हितेश वाळुंज, सिद्धेश वीर, अझीम काझी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. सिक्कीमने 50 षटकांत 234 धावा करीत 235 धावांचे लक्ष्य दिले. महाराष्ट्राच्या संघाने हे लक्ष्य अवघ्या 34 षटकांत पार केले. महाराष्ट्र संघाने 34 ओव्हरमध्ये 238 धावा करीत सहज लक्ष्य पूर्ण केले.
मागच्या सामन्यात मेघालयवर विजय
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी अक्षरश: मेघालचा धुव्वा उडवला. शेवटची फळी कापून काढत अवघ्या 113 धावांवर मेघालयचा ऑलआऊट केला. शेवटचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये वीरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाची विजयी घौडदौड सुरूच आहे. महाराष्ट्राच्या संघाने धमाकेदार खेळी करीत मेघालयवर शानदार विजय प्राप्त केला. मेघालयचा प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 113 धावांवरच ऑलआऊट झाला. यानंतर महाराष्ट्र संघाने अवघ्या 20 षटकांमध्येच आपले टार्गेट पूर्ण केले.
मेघालयचा डाव घसरला
महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयचा डाव अक्षरश: कोसळला. अर्पित सुभाष वगळता एकाही फलंदाजाला 30चा आकडा पार करता आला नाही. महाराष्ट्रकडून एस ए वीरने सर्वाधिक विकेट घेतल्या. वीरने 3, तर हंगरेकरने 1, गुर्बानीने 2, बच्छावने 2, दधेने 1 विकेट घेतली.