Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

” ‘संतोष’ चित्रपटाची कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यंत चर्चा होते, पण भारतात मात्र…” किरण मानेंची पोस्ट व्हायरल

ऑस्करपर्यंत पोहोचलेला 'संतोष' चित्रपट परदेशात गाजताना दिसतोय. मात्र या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ दिले जात नाही. यासंदर्भात अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 08, 2025 | 04:28 PM
" 'संतोष' चित्रपटाची कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यंत चर्चा होते, पण भारतात मात्र..." किरण मानेंची पोस्ट व्हायरल

" 'संतोष' चित्रपटाची कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यंत चर्चा होते, पण भारतात मात्र..." किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री शहाना गोस्वामीची मुख्य भूमिका असलेला ‘संतोष’ (Santosh) चित्रपट कमालीचा चर्चेत आला आहे. आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री शहाना गोस्वामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर या चित्रपटासाठी युकेने ऑस्करमध्ये प्रवेशिकाही दाखल केली होती, चित्रपटाला ऑस्करमध्ये शॉर्टलिस्टही करण्यात आले होते. हा चित्रपट परदेशात चर्चेत राहतो, पण भारतात चित्रपटाची चर्चा होत नाही. ऑस्करपर्यंत पोहोचलेला ‘संतोष’ चित्रपट परदेशात गाजताना दिसतोय. मात्र या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ दिले जात नाही. यासंदर्भात अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

शारीरिक संबंध एन्जॉयसाठी म्हणणाऱ्या नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट कशी झाली, प्रेग्नंट झाल्यानंतर…

शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेता किरण माने म्हणतात, “‘संतोष’ नावाच्या एका हिंदी सिनेमानं जगभरात हलचल निर्माण केलीय भावांनो… कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यंत चर्चा सुरू आहे… पण भारतात मात्र तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. आहे की नाही गंमत?

एका लहान दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेभोवती फिरणारा हा सिनेमा ब्रिटन, युरोप, अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलाय… पण भारतीय सेन्सॉर बोर्डानं मात्र त्या सिनेमाच्या प्रदर्शनात अडचण निर्माण केलीय. कारण काय? तर या सिनेमात, आपल्या भारतीय व्यवस्थेत दलित आणि मुस्लिम समाजाचं कसं छुपं शोषण केलं जातं याचं भेदक वास्तव उलगडून दाखवलं आहे.

जनमत पाठीशी नसताना झोलझाल करून सत्तेत बसलेले हुकूमशहा सगळ्यात जास्त कुणाला घाबरत असतील तर सत्यशोधक, निर्भिड कलाकारांच्या आवाजाला. हिटलरपासून मुसोलिनीपर्यंतची उदाहरणं आहेत इतिहासात. आपल्याकडं हल्ली तर साधे स्टॅंडअप कॉमेडियन्ससुद्धा सत्ताधार्‍यांच्या बुडाला आग लावताना पहातोय आपण. “कोण नामदेव ढसाळ? आम्हाला माहिती नाही” असं म्हणत नामदेव ढसाळांची कविता सिनेमातून काढून टाकायला लावण्याचा निर्लज्ज भेकडपणा बघतोय… हा तर ऑस्करमध्ये जगभरातल्या सगळ्या देशांमधल्या सिनेमांना तगडी टक्कर देणारा सिनेमा ! डरना तो ज़रूरी है मेरे भाई.

 

“कुत्रे आहेत, भुंकणारंच…”, गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता आहुजा कोणावर भडकली?

शाहाना गोस्वामी या अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रीची प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट संध्या सूरी या दिग्दर्शिकेनं दिग्दर्शित केला आहे. ‘संतोष’ नावाच्या महिलेभोवती फिरणारं हे कथानक. पोलीसमध्ये नोकरीला असलेला तिचा नवरा दंगलीत मारला जातो आणि त्याच्या जागेवर तिला भरती करून घेतलं जातं. तिच्याकडं पहिलीच केस येते एका अल्पवयीन दलित मुलीच्या अपहरणाची… ज्या मुलीवर बलात्कार होऊन तिचा खुन झाल्याचं सिद्ध होतं… या तपासाची ही खुर्चीला खिळवून ठेवणारी कहाणी आहे.

आपल्या वर्तमान व्यवस्थेत दलित आणि मुस्लीमांबद्दल आकस धरून कसं शोषण केलं जातं याचं अतिशय प्रभावी चित्रण असलेल्या या सिनेमानं जगात खळबळ माजवलीय. ‘भारतीय समाजव्यवस्थेचा आवाज’ असा चारीबाजूंनी गुणगौरव होतोय… पण आपल्या देशात मात्र हाच आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. भारतीय संविधानाबद्दल आस्था असणार्‍या या मातीतल्या मूलनिवासी माणसा…
अजून तरी होय जागा । तुका म्हणे पुढे दगा ।।”

भक्तांना मिळणार स्वामींच्या रामरूपात दिव्य आशीर्वाद; ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत रामनवमीचा अलौकिक उत्सव

Web Title: Marathi actor kiran mane shared bollywoo movie santosh banned in india regarding post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Kiran Mane

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.