govinda wife sunita ahuja reacts to trolls over her divorce rumors
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा पत्नी सुनीता आहुजा सोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. काही महिन्यांपूर्वी, सुनीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, अशी माहिती स्वत: त्यांचे वकील ललित बिंदल यांनी सांगितले होते. परंतु त्यांनी असेही सांगितले होते की, त्यांच्यातील समस्यांचे निराकरण झाले असून त्यांनी जोडपे एकत्र असल्याचे आश्वासनही दिले होते.
लोकनृत्यकार पद्मश्री राम सहाय पांडे यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
त्यानंतर आता सुनीता आहुजा यांनी वारंवार सुरु असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आणि ट्रोलिंगबाबत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, सुनीता आहुजा यांनी ट्रोलर्सनादेखील चांगलंच सुनावलं आहे. शिवाय, घटस्फोटाच्या अफवांवर आपली भूमिका स्पष्ट केली. घटस्फोटाच्या चर्चांवर सुनीता आहुजा म्हणतात, “लोक नकारात्मक गोष्टी बोलत असले तरी मी सगळं काही सकारात्मक पद्धतीने घेऊ लागली आहे. “ते सकारात्मक असो वा नकारात्मक…” जर ते सकारात्मक असेल तर मला ते माहित आहे. मी हा विचार करते की, ते कुत्र्यांप्रमाणे भुंकत आहेत. जोपर्यंत माझ्याकडून किंवा गोविंदाकडून थेट काही तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत लोकांनी आमच्या नात्याबद्दल कशावरही विश्वास ठेवू नये.”
मलायका अरोरा विरोधात वॉरंट जारी, २९ एप्रिल रोजी होणार सुनावणी; नेमकं कारण काय ?
सुनीता पुढे म्हणाली की, “मला प्रेमळ पती आणि दोन सुंदर मुले मिळाल्याबद्दल मी कायमच स्वत:ला भाग्यवान समजते. जोपर्यंत तुम्हाला माझ्याकडून किंवा गोविंदाकडून काहीही ऐकू येत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यात काय आहे आणि काय नाही, याचा विचार करु नये. गॉसिपचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.” मुलाखतीत सुनीताने मुलगा यशवर्धनच्या बॉलिवूड डेब्यूवरही भाष्य केलं. याबद्दल तिने सांगितले की, “नेहमीच त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि वडिलांच्या सावलीत न राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यशने ‘ढिशूम’, ‘बागी’ आणि ‘किक २’ सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तू गोविंदासारखं वागण्याचा प्रयत्न करू नकोस. गोविंदाचे स्वतःचे स्थान आहे, त्याच्यासारखे कोणीही कधीच होणार नाही.”