Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurga News: “…हे आमचे ध्येय आहे”; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2025 | 09:49 PM
Sindhudurga News: "...हे आमचे ध्येय आहे"; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

Sindhudurga News: "...हे आमचे ध्येय आहे"; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला जिल्हा
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात आशिष शेलार यांनी घेतली बैठक
रामगडला ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला, धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे शास्त्रीय उत्खनन, भगवंतगडची पुरातत्त्वीय पाहणी आणि रामगडला ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

मालवण तालुक्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्सव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, उपसचिव नंदा राऊत तसेच चिंदरचे उपसरपंच महेंद्र मांजरेकर, नांदोशी उपसरपंच विजय निकम, संतोष गावकर, हेमंत दळवी, धोंडू चिंदरकर, शुभम मटकर, ग्रामसेवक सरिता धामापूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणाच्या विकासासाठी ठोस कार्यक्रम सुरू आहे. कोकणाच्या या वारशात सिंधुदुर्गलाही आपला हक्काचा वाटा मिळावा, हे आमचे ध्येय आहे.

बैठकीत घेतलेले तीन महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे 

नांदोश गढीचे उत्खनन:  मालवण तालुक्यातील २८ गुंठे क्षेत्रफळ असलेल्या नांदोश गढीचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून त्यातील ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्खननासाठी लागणारा निधी मंजूर करून कामाला तत्काळ सुरुवात होणार आहे.

भगवंतगडची पाहणी:  सिद्धेश्वर मंदिर परिसरासह सुमारे २.५ एकर क्षेत्रफळातील भगवंतगडवरील संवर्धन आणि जतनासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

रामगड ‘राज्य संरक्षित वास्तू’: मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया तत्काळ सुरू होईल.

या तिन्ही उपक्रमांसाठी स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद सदस्य आणि खासगी जमिनींचे मालक यांच्या संमतीने काम राबवले जाणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, नांदोश गढी, भगवंतगड आणि रामगड हे इतिहासाचे सजीव प्रतीक आहेत. या ठेव्याचे संवर्धन करणे हे आपले सामूहिक कर्तव्य असून शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे.

Web Title: Minister ashish shelar acceleration in conservation of historical forts tourism heritage in sindhudurga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Sindhudurg
  • tourism

संबंधित बातम्या

Career in Tourism: भटकंतीसोबत पर्यटन क्षेत्रात करिअर कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
1

Career in Tourism: भटकंतीसोबत पर्यटन क्षेत्रात करिअर कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू
2

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई
3

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
4

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.