Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मंत्री संदीपान भुमरे यांच्या अडचणी वाढल्या…

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांनी संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारला नाही. तसंच न्यायालयाने संदीपान भुमरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असा दत्तात्रय गोरडे यांनी सादर केलेला दिवाणी अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 14, 2021 | 01:47 PM
कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मंत्री संदीपान भुमरे यांच्या अडचणी वाढल्या…
Follow Us
Follow Us:

औरंगाबाद : राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. लॉकडाऊन काळात विकासकामांचं उद्घाटन करुन कोविडविषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर हायकोर्टात गुरुवारी (13 मे) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या वेळी संदीपान भुमरे यांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. मात्र न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांनी संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारला नाही. तसंच न्यायालयाने संदीपान भुमरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असा दत्तात्रय गोरडे यांनी सादर केलेला दिवाणी अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.

दरम्यान मागील आठवड्यात संदीपान भुमरे यांनी पैठण या आपल्या मतदारसंघात संचारबंदी काळात गर्दी जमवून विकासकामांचं उद्घाटन केलं होतं. यानंतर पाचोड पोलिसांत संदीपान भुमरे वगळता इतर लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली. “मी उद्घाटन केलं नाही,” असं म्हणणारे संदीपान भुमरे यांनी न्यायालयात सांगितलं की “मी उद्घाटन केलं, मात्र गर्दी जमवली नाही. मला तिथे गेल्यानंतर अशी गर्दी पाहून आश्चर्य वाटलं,” असं सांगून त्यांनी बिनशर्त माफी मागितली. परंतु न्यायालयाने ती स्वीकारली नाही.
याउलट न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल करणाऱ्या अर्जदाराला या प्रकरणात पोलिसात धाव घेण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर पुन्हा खंडपीठात येण्याची मुभा देखील दिली आहे. त्यामुळे मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

[read_also content=”अहंकार सोडा, संपूर्ण देशात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा; संजय राऊतांचा मोदी सरकारला सल्ला https://www.navarashtra.com/latest-news/let-go-of-ego-apply-maharashtra-model-all-over-the-country-sanjay-rauts-advice-to-modi-government-nrdm-128722.html”]

राजकीय पुढाऱ्यामुळेच कोरोनाचा फैलाव होणार नाही का ?

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या सुनावणीत शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ताशेरे ओढले होते. “काही दिवसांपूर्वी एका शिवसेना नेत्याने प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेतल्याची बातमी होती. मुख्यमंत्र्यांनी कोणताही जाहीर कार्यक्रम न घेण्याचं आवाहन केलेलं असतानाही हे कार्यक्रम होत आहेत? अशाने या राजकीय पुढाऱ्यामुळेच कोरोनाचा फैलाव होणार नाही का? या नेते मंडळींवर कारवाईही होत नाही, याचं अर्थ पोलीस आणि राजकारण्यांचं काही साटंलोटं आहे का?” अशा प्रश्नांची सरबत्ती हायकोर्टाने केली. “आता आम्हालाच स्पष्ट आदेश जारी करावे लागतील की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने कोणताही जाहीर कार्यक्रम करु नये,” असं हायकोर्टाने पुढे म्हटलं. शिवसेना नेत्याच्या या कार्यक्रमात कोरोनाबाबतच्या सुरक्षा नियमांचा पूर्ण फज्जा उडाला होता. नेत्यांनी मास्क नाकाच्या खाली घातला होता, इतर काहींनी तर मास्कही घातला नव्हता. आमदार त्यांच्याच मतदारसंघात लॉकडाऊनचे नियम पाळू इच्छित नाहीत. प्रत्येकाने स्वत:ला थोडी शिस्त लावायला हवी, प्रत्येकाने लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळायलाच हवे. मात्र काही राजकारण्यांकडूनच या निमवालीचं उल्लंघन होणं दुर्दैवाचं आहे,” असं मत हायकोर्टाने नमूद केलं.

Web Title: Minister sandipan bhumares problems increased due to violation of corona rules nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2021 | 01:46 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • sandipan bhumre
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा
2

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.