Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळवडीनिमित्त ब्रास बँडवर थिरकल्या आमदार मंदा म्हात्रे, रंग खेळण्यात झाल्या दंग ; पाहा VIDEO

आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) महिलांसह होळी व धुलीवंदनाचा सण सीबीडी-बेलापूर येथे साजरा केला.

  • By साधना
Updated On: Mar 07, 2023 | 09:43 PM
mla manda mhatre

mla manda mhatre

Follow Us
Follow Us:
नवी मुंबई: हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला हा होळीचा सण दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) महिलांसह होळी व धुलीवंदनाचा सण सीबीडी-बेलापूर येथे साजरा केला. धुळवडीनिमित्त (Dhulvad Celebration)आ.मंदा म्हात्रे  ब्रास बँडवर थिरकताना दिसल्या. यावेळी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आलेल्या बंजारा समाज, राजस्थानी महिला व कोळी महिला या प्रमुख आकर्षण होत्या. कोळी बँड तसेच राजस्थानी गाण्यांच्या ठेक्यावर सर्वांचेच पाय थिरकताना दिसले. यावेळी भाजपा युवती प्रमुख सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे, लाजवंती भोसले, ममता सिंग तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे यावर्षीही होळी व धुलीवंदनाचा सण साजरा केला जात आहे. कोरोना काळात महाभयंकर परिस्थिती असल्यामुळे हा सण साजरा करण्यात आला नव्हता.   मात्र बंजारा समाज, राजस्थानी लोकगीते, कोळी बँडसोबत धुमधडाक्यात रंगांची उधळण करत हा सण आज साजरा करण्यात आलेला आहे.

पाहा VIDEO :

होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधगिरी पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल रसायनयुक्त रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे रसायन मिसळले रंग न वापरता ऑरगॅनिक सेंद्रिय रंगाचा वापर करावा. तसेच सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. शक्य असेल तर फुलांच्या वर्षावाने धुळवड साजरी करावी. आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी नागरिकांना केले.

Web Title: Mla manda mhatre celebrated dhulvad in navi mumbai nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2023 | 11:35 AM

Topics:  

  • holi
  • Marathi News
  • MLA Manda Mhatre
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Ebola Outbreak : नायजेरियात इबोलाचा शिरकाव; पहिल्या रुग्णाची पुष्टी, ४४ जण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली
1

Ebola Outbreak : नायजेरियात इबोलाचा शिरकाव; पहिल्या रुग्णाची पुष्टी, ४४ जण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; ७३ जणांचा मृत्यू, अडीच लाख नागरिक विस्थापित!
2

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; ७३ जणांचा मृत्यू, अडीच लाख नागरिक विस्थापित!

Ahilyanagar News :अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत विखे-थोरातांना धक्का; बिनविरोधचा फॉर्म्युला फसला,२ नोव्हेंबरला रणधुमाळी
3

Ahilyanagar News :अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत विखे-थोरातांना धक्का; बिनविरोधचा फॉर्म्युला फसला,२ नोव्हेंबरला रणधुमाळी

China-Taiwan Conflict : चीन तैवान संघर्ष ; दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या
4

China-Taiwan Conflict : चीन तैवान संघर्ष ; दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.